वुमन डॉक्टर्स विंग संघटना अध्यक्षपदी डॉ.अनुजा कुलकर्णी
लातूर ः इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेचा विभाग असणार्या वुमन डॉक्टर विंग या महिला डॉक्टर्स लातूर शाखेच्या अध्यक्षपदी प्रसिध्द स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.अनुजा कुलकर्णी यांची तर सचिवपदी, डॉ.रचना जाजू यांची निवड करण्यात आली.
वुमन डॉ.विंग या महिला डॉक्टर्स विभागाच्या अध्यक्षा डॉ.अनुजा कुलकर्णी यांनी मावळत्या अध्यक्षा डॉ.ज्योती पाटील यांच्याकडून तर, सचिव डॉ.रचना जाजु यांनी डॉ.कल्पना किनीकर यांच्याकडून आपापल्या पदाचा पदभार स्वीकारून प्रत्यक्ष कामाला सुरूवातही केली आहे. तर या संघटनेत 150 महिला डॉक्टर सभासद आहेत. या संघटनेच्या माध्यमातून ‘महिला डॉक्टरांचे प्रलंबीत प्रश्न’, दैनंदिन समस्या सोडविण्यावर भर देणार आहे. तसेच महिला डॉक्टरांचे वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान वाढविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रयत्न करणार आहे. यासाठी येत्या काळात कार्यशाळा, चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ.अनुजा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. महिला डॉक्टरांशी सतत संपर्क ठेवून सुसंवाद वाढविण्याकडे अधिक लक्ष देणार आहेत असेही त्या पुढे बोलतांना म्हणाल्या.
वुमनस डॉक्टर विंगच्या अध्यक्षा डॉ.कुलकर्णी यांनी एकत्रीकरण टाळून झुमद्वारे महिला डॉक्टरांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संघटना वाढीसाठी आपल्या सुचनांचा आदर केला जाईल असे त्यांनी यावेळी बोलतांना सुचित केले.
वुमन डॉक्टर विंग लातूर शाखेची नवीन कार्यकारणी अशी ः
डॉ.सरिता मंत्री, डॉ.सुरेखा काळे, डॉ.वसुधा जाजु, डॉ.ज्योती पाटील, डॉ.सुचित्रा भालचंद्र(सल्लागार मंडळ), डॉ.संगीता देशपांडे, डॉ.सरिता काळगे, डॉ.स्नेहल देशमुख, डॉ.नीता मस्के-पाटील, डॉ.वैशाली टेकाळे(सर्व उपाध्यक्ष), डॉ.स्वाती कवळास, डॉ.मनिषा बरमदे, डॉ.उमा लोखंडे, डॉ.दिपीका भोसले, डॉ.श्वेता काटकर (सर्व सहसचिव), डॉ.राखी सारडा(कोषाध्यक्ष), डॉ.प्राची रायते(सहकोषाध्यक्ष), डॉ.कल्पना जाधव (प्रांत प्रतिनिधी), डॉ.मोहिनी गानू(शैक्षणिक विभाग प्रमुख), डॉ.प्राची रूईकर(शैक्षणिक विभाग), डॉ.शैला सोमाणी व डॉ.मनिषा बरमदे (निधी संकलन), डॉ.सुनिता कामदार व डॉ.शुभांगी राऊत(सामाजिक स्वास्थ्य जनजागृती), डॉ.राजेश्री सावंत व डॉ.कल्पना किनीकर (सांस्कृतीक), डॉ.आरती झंवर व डॉ.वर्षा दराडे (क्रीडा विभाग), डॉ.रामेश्वरी अलाहाबादे व डॉ.दिप्ती देशमुख(महिला डॉक्टर स्वास्थ्य विभाग), डॉ.ज्योती सुळ व डॉ.अर्चना कोंबडे (जनसंपर्क), डॉ.स्वाती गोरे(मिशन पिंक हेल्थ प्रमुख).