लातूर मधिल रियल हिरो
शहरात३६५ दिवस वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन अविरत चालते
लातूर परीसरात लातूर वृक्ष ही लोक चळवळ २०१५ पासून कार्यरत आहे. लातूर वृक्ष ने २०१५ पासुन ३५ हजार लहान मोठी झाडे लावलेली आहेत.
यावर्षी १ जुन २०१९ पासून ते ३१ मे २०२० या काळात लातूर वृक्ष टिमच्या सदस्यांनी ३६५ दिवस अविरत वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाचे काम केले आहे.
सोबत बाग काम स्पर्धा, कुंडी भरणे कार्यशाळा, बोन्साय प्रदर्शन व कार्यशाळा असे उपक्रमही घेतले आहेत
-------------------
गेल्या ३६५ दिवसात लातूर वृक्ष टिम सदस्यांनी १८००० लहान मोठी झाडे लावली आहेत.
सर्व झाडे लावून त्यांचे नियमित पणे संगोपन केले आहे. या वर्षभराच्या काळात २६० पाण्याच्या मोठ्या टॅकरद्वारे सर्व झाडांना दिवस रात्र पाणी देऊन झाडे जगविली आहेत.
------------------
कोव्हिड १९ च्या लॉक डाऊन काळात लातूर वृक्ष टीमने १८०० मोठी झाडे लावून एक नवा विक्रम स्थापित केला आहे.
-------------------
बेवारस जनावरांकरीता पाण्याचे हौद भरणे, पक्षांकरीता फळांची झाडे लावणे, निसर्ग पक्षी उद्यान तयार करुन तिथे मोठी फळांची झाडे लावण्यात आली आहे.
** स्वामी विवेकानंद चौक ते गरुड चौक
** साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते छत्रपती शाहू महाराज चौक
** यशवंत शाळा
** जिजामाता शाळा
** गोदावरी कन्या प्रशाळा
** तहसील ऑफिस ते महात्मा गांधी चौक दुभाजक
** एक नंबर चौक ते ईदगाह मैदान दुभाजक
** क्रिडासंकुल ते राजीव गांधी चौक दुभाजक
** नक्षत्र गार्डन
** आय. टी. आय. महाविद्यालय
** जिल्हा क्रिडा संकुल
** पॉलीटेक्नीक कॉलेज औसा रोड
** बार्शी रोड दुतर्फा
** अंबेजोगाई रोड नवीन बस स्थानक
** जुना रेणापुर नाका - ते बालाजी मंदीर रस्ता
** बिर्ला स्कूल परीसर
** जुना रेणापुर नाका ते इंडिया नगर ते दिपज्योती नगर ते डॉक्टर्स कॉलनी
** पद्मा नगर
** छत्रपती शिवाजी महाराज चौक
**उड्डाण पुल भुयारी मार्ग
** मंठाळे नगर
** शाम नगर पशू वैद्यकीय दवाखाना
** जिल्हा परीषद मागचा रस्ता ते शाम नगर रस्ता
** बर्दापूर गावात
** खाडगाव स्मशान भुमीजवळ.
** किसान बॅक कॉलनी.
** राघवेंद्र कॉलनी
** चौधरी नगर
** स्वराज्य नगर
** राधाकृष्ण कॉलनी
** कैलाश नगर
** राणी अहिल्याबाई होळकर पुतळा
** गवळी नगर
** बरकत नगर
** शिवाजी नगर ग्रीन बेल्ट
इत्यादी सर्व ठिकाणी मोठी झाडे लावून त्या झाडांना नियमितपणे पाणी देउन झाडांचे संगोपन सुरु आहे.
--------------------
जागतिक महिला दिनानिमित्त लातूर वृक्ष चळवळीस सहकार्य करणारया महिलांचा सत्कार करण्यात आला.
---------------
लातूर वृक्ष टिमचे सदस्य गेली ३६५ दिवस वृक्ष संगोपनाचे कार्य करत आहे. त्या सर्व सदस्यांच्या आई-वडिलांच्या हस्ते झाडे लावून त्यांचा गौरव करण्यात आला.
----------------
जन्म वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, पुण्यतिथी, जयंती. मुला-मुलीचा जन्म, सुनेचा वाढदिवस यासर्व निमित्ताने लातूर वृक्षला झाडांची मदत करावी असे आवाहन लातूर वृक्ष टिमद्वारे करण्यात येते. लातूर करांनी या चळवळीस लोक चळवळ समजुन भरभरुन मदत केली त्यामुळे ही चळवळ अविरतपणे पुढे जात आहे.
-----------
कोणत्याही सरकारी मदतीशिवाय सुरु असलेली ही चळवळ आहे. लातूर वृक्ष टिम ला कोणीही अध्यक्ष , सचिव , पदाधिकारी नाहीत. कडुनिंबाचे झाड हे या लातूर वृक्ष टिम चे अध्यक्ष आहेत तर वड, पिंपळ, आकाशमोगरा, करंज हे सर्व मार्गदर्शक आहेत.
----------
३६५ दिवस अविरत कार्य करणात्या लातूर वृक्ष टिममध्ये डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, डॉ. भास्कर बोरगावकर, पद्माकर बागल, संगमेश्वर बोमणे, मनमोहन डागा, प्रमोद निपानीकर, रुषिकेश दरेकर, ॲड. वैशालीताई लोंढे, मनपा लातूर नगरसेविका श्वेता लोंढे, नगरसेविका स्वाती घोरपडे, वैभव डोळे, गंगाधर पवार, सुहास पाटिल, जफर शेख, हितेश डागा, चैतन्य प्रयाग, गौरव पाटील, कल्पना फरकांडे, संजय जमदाडे, विकास कातपुरे, आशिष सुर्यवंशी, डॉ. मुश्ताक सय्यद, नामदेव सुब्बणवाड, डॉ. शांतीलाल शर्मा, सार्थक शिंदे, रुषिकेश पोद्दार, पुजा निचळे, प्रफुल्ल पाटिल, स्वाती यादव, सौ. सुरेखा कारेपुरकर, हे कार्यरत आहेत.