आ.धिरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत कामगार मध्यप्रदेशकडे रवाना.
लातूर :-- कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात रोजगारासाठी स्थायीक असलेले कामगार त्यांच्या गावी जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा मजूरांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठ्या प्रमाणात सोय उपलब्ध करून दिली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज दि.१३/५/२०२० रोजी लातूर जिल्ह्यातील १७४ कामगार बसेस मधून मध्यप्रदेशकडे पाठवण्यात आले. या मध्ये लातूर मधून २ आणि रेणापूर वरून ५ बसेस मधून स्वगृही जाण्याची व्यवस्था करण्यात आली. या बसला हिरवा झेंडा दाखवून लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी रवाना केले. सदरील कामगार त्यांच्या राज्याच्या सीमे पर्यंत पोहोचवले जाणार आहे.
आत्ता पर्यंत लाॅक डाऊन मुळे अडकलेल्या बाहेरील राज्यातील कामगारांना लातूर - 6 बस १२० प्रवाशी रेणापूर- ५ बस १३४ प्रवाशी व औसा तालुक्यातून - ७ बस १३२ प्रवाशी पाठवण्यात आलेले आहेत.
लाॅकडाऊन वाढत चालला आहे त्यामुळे अनेक कामगार आप-आपल्या गावी जावू इच्छीत आहेत. अशावेळी त्यांना त्यांच्या गावी सहजतेने जाता यावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेतला असून यासंबंधी काॅग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी व राहूलजी गांधी यांनी देशभरातील काॅग्रेसजणांना सुचना करून संबंधीत कामगार योग्य ते सहकार्य करावे अशा सुचना केल्या होत्या. यासंबंधी काॅग्रेसजण कामगारांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी सहकार्य करत आहेत.
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना अमित विलासराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील इतर जिल्हे व अन्य राज्यात जावू इच्छीत असलेल्या मजूरांना एस.टी. बस उपलब्ध करून दिल्या आहेत