Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

हे कसले कोरोना योद्धे?ही तर कोरोना गिधाडे

हे कसले कोरोना योद्धे?ही तर कोरोना गिधाडे


कोरोना ह्या जागतिक महामारीने जगभरात उच्छाद मांडलेला असून आजवर जगभरातील 4 लाख 37 हजार माणसे मृत पावली आहेत ,,
आजवर भारताचा क्रमांक हा 5 वा लागत होता तो 4 था आलेला आहे ,व  दर 17 दिवसांनी भारतीय रुगणाची संख्या दुप्पट होत आहे ,,
इतकी भीषण परिस्थिती असताना ही केंद्र व राज्य सरकारने ही कोरोना पुढे हात टेकले आहेत ,ते हात टेकणारच होते ,
यात आम्हांला तरी संदेह नव्हता 
याचे प्रमुख कारण भारतात  भारतीय लोकांची असलेली आरंभ शूरता ऐन वेळेस लोप पावते 
जेंव्हा कोरोना चा उदय झाला होता तेंव्हाच जी अतिदक्षता घेणे गरजेचे असतें तेव्हा 
केंद्र सरकार सुस्त राहिले 
*अपने ही मगन मे मस्त*
राहिले आणि तब्बल दीड महिन्या नंतर त्यांना जाग आली ,
घाई गडबडीत लॉक डाऊन पुकारला तो पर्यंत वेळ टळून गेली होती 
*बैल गेला व झोपा केला*
अशी म्हण आपल्या कडे आहे ,
देशात आरोग्य व्यवस्थेची झालेली हेळसांड ,सार्वजनिक आरोग्य सेवेची उदासीनता ,व त्यातील सुविधा चा अभाव हे दृष्ट चक्र आपल्या कडे अस्तित्वात होतेच ,परंतु त्यात ही खासगी दवाखान्यातील सेवा भाव लुप्त होऊन तेथे निर्माण झालेली व्यावसायिक व लुटारू वृत्ती अधिक घातक होती ,,
डॉक्टर हे देव असतात ही भावना असणारा मोठा वर्ग आज डॉक्टरांकडे समाजव्यवस्थेतील लुटारू म्हणून पाहतो आहे हे वास्तव आहे 
सरकार पातळीवरील भ्रष्टाचार आता जनतेला नवीन नाही ,साधी कोरोना टेस्ट किट ही 250 रुपयांची असताना ती 650 रुपयाला मध्यस्थाकडून सरकारने विकत घेतली ,,
गुजरात सारख्या राज्यात 1 लाख घेतलेली व्हॅटिलेटर ही बनावट निघाली ,कोरोना टेस्ट किट बनावट निघाली ,पण ह्या कडे ही पक्षीय दृष्टिकोन ठेवत *आपला तो बाळू दुसऱ्याचे कार्ट*
करीत बहुसंख्य लोक अंध बनून दुर्लक्ष करीत राहिले ,
*650*
रुपयांचा मृतदेह बॅग ही *6000*
ते *7500*
रुपया पर्यंत दिली गेली ,,
आम्ही विद्यार्थी दशेत असताना डॉ आनंद नाडकर्णी यांचे *क्लोरोफॉर्म*
नावाचे पुस्तक वाचले होते ,वैदयकिय पेशात निर्माण झालेल्या साखळी वर त्यांनी त्यात प्रहार करीत त्यातील सत्य लोकांसमोर उघडे केले आहे ,,
साधा एम आर पी असलेला डॉ आपल्या कडे आलेल्या पेशंटला घाबरवून मोठ्या हॉस्पिटल कडे कसा पाठवतो ,तेथे गेल्यानंतर विविध तपासण्या च्या चक्रात माणसाला घातले जाते दर 10 ते 12 तासा नि रक्त लघवी तपासून रिपोर्ट घेतले जातात ,,व रक्तातील पेशींचे प्रमाण हिमोग्लोबिन चे प्रमाण तपासले जाते ,, या लैब वाल्या कडून डॉ ना कमिशन दिले जाते ,,
एम आर असलेले लोक विविध औषधी कंपन्या कडून डॉ भेटी देतात व डॉ नि कोणती प्रिस्क्रीपशन ची औषधे द्यावीत याची माहिती देतात ,असे आपणास वरकरणी वाटते ,परंतु त्या बदल्यात ते त्यांना विविध भेटी देतात अगदी परदेश दौरे ही त्यांचे केले जातात ,,
हे सर्व कथन करण्यासाठी कारण ही असेच घडलेले आहे 
*विले-पार्ले येथील नानावटी या नावाजलेल्या दवाखान्यात एका रुग्णा च्या उपचाराचे बिल 1 दोन लाख रुपये नाही तर 7लाख50000रुपये* 
इतके मोठे आकारण्यात आले ,
याहून दुःखद बाब ही की तो पेशंट मृत होता
आणि बिल दिल्याशिवाय मृतदेह नातेवाईकांना देण्यास रुग्णालय तयार नव्हते ,
*महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे नेते संदीप देशपांडे तिथे गेले* ,, त्यांच्या 
दबावापुढे झुकून ते बिल ही माफ केले व मृतदेह ही नातेवाईकांना दिला गेला
त्यांनी जेंव्हा बिलाची तपासणी केली तेंव्हा *प्रत्येक पेशंट ला एकाच पी पी इ किट चे बिल लावले गेले होते*
जणू काही प्रत्येक वेळेस ते नवीन वापरत होते ,,
आज वैद्यकीय फक्त व्यवसाय उरलेला नाही तर ती इंडस्ट्रीत रूपांतरित झालेली आहे ,,रुग्णाच्या नातेवाईकांचे आर्थिक शोषण करणे हाच घृणास्पद हेतू या मागे उरलेला आहे ,,
अगदी शासकीय योजना ही ज्या खाजगी दवाखान्यात दिल्या जातात तेथेही या योजनांचे पैसे सरकार द्वारे घेऊन ही अजून तुमची मंजुरी आलेली नाही ,तेंव्हा तातडीने या बाबी तुम्ही आणून द्या असे सांगितले जाते ,
हृदय रोगा बद्दल तर विचारूच नका ,
इंजिओप्लाष्टी मध्ये वापरल्या जाणाऱ्या स्ट्रेंथ ,भारतीय बनावटीच्या की परदेशी?यावर त्याचे बिल आकारले जाते ,हृदय झडपा चे ऑपरेशन शासकीय अनुदानातून करताना ही साध्या डॉक्टर कडून करू की पुणे येथील एक्सपर्ट कडून?याची विचारणा करून लूट केली जाते ,,
कोरोना चे रुग्ण वाढत आहेत आणि समाजात मृत्यू चे प्रमाण ही वाढलेले आहे ,सोलापूर येथील स्मशान भूमीत ही अंत्यविधीसाठी रांगा लागल्याने बुकिंग चालू झालेले आहे ,,असे परवाच  माझा मावस भाऊ सांगत होता ,पोलीस दलातून निवृत्त झालेल्या एका नातेवाईकांचे दहन करण्यासाठी ही त्यांना जीव तोड मेहनत करावी लागली ,,
दवाखाने अपुरे पडत असल्याने घरीच उपचार घ्यावे लागणार आहेत 
इतक्या बिकट प्रसंगात ही अनेकांना राजकारण सुचतेच कसे? हा प्रश्न आम्हांला पडतो ,,
*अंतिम परीक्षा न घेऊन सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे*
*असे विनोद तावडे आरोप करतात*
सरकार *भवितव्याशी*
 तर  विरोधक *जीविताशी*
असे आम्ही म्हटले तर चालेल का?
राजकारण बाजूला ठेवा ,सर्व लोकप्रतिनिधींनी ,वैद्यकीय सेवा जनतेला मिळते का या कडे लक्ष द्यावे ,
जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही *जनतेसोबत* व *जनतेबरोबर* आहोत हे दर्शवून द्यावे ,,
कोरोना व नैसर्गिक आपत्तीत हीच कसोटी लोकप्रतिनिधींची असते ,,
जिथे कुठे गिधाडे असतील ,,जी या काळाचा गैरफायदा घेऊन जनतेला लुटत राहतील ,मग ते व्यापारी असो वा डॉक्टर ,त्यांना कायद्याने ठेचून काढा ,, कारण ही माणसे नसून 
*वखवखलेली गिधाडे आहेत*
   तूर्त इतकेच,,,।
जय हिंद ,जय महाराष्ट्र,,,।
***************


ऍड अविनाश टी काले


अकलूज 
9960178213


Previous Post Next Post