Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

सुशांतसिंग राजपूत*,,,,,,,,,,, *आत्महत्या व डिप्रेशन

सुशांतसिंग राजपूत,,,,,,,,,,,
आत्महत्या व डिप्रेशन


 


बॉलिवूड ऍक्टर सुशांतसिंग या ऊन्या पुऱ्या 34 वर्ष वयाच्या तरुणाने बांद्रा येथील राहत्या घरी रविवार दिनांक 14 /6/2020 रोजी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली अशी बातमी येऊन थडकली ,आणि सामान्य माणसापासून ते सिने क्षेत्रातील दिगग्ज ही हळहळले ,अनेकांनी दुःख व्यक्त करावे अशीच ही परिस्थिती आहे ,,
त्यांचे घरात कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही  ,व घटना घडण्यापूर्वी त्यांनी मित्राला फोन केला होता परंतु तो फोन उचलला गेला नाही ,
आत्महत्ते पूर्वी त्यांनी फळांचा ज्युस मागवला होता ,ही आत्महत्या की हत्त्या याची तपासणी मुंबई पोलीस करीत आहेत ,
या घटनेची चौकशी सि बी आय सारख्या संस्थानी करावी अशी भूमिका महाराष्ट्रा बाहेरील लोक करीत आहेत ,व यात महाराष्ट्र विरुद्ध इतर राज्य अशी ही मांडणी केली जात आहे ,,
वास्तविक पाहता असा इतिहास महाराष्ट्राचा नाही व ही संस्कृती ही महाराष्ट्राची नाही ,,
कोणते कलाकार कोणत्या विभागातून मुबई त आले आहेत यावर त्याचा स्वीकार किंवा नकार महाराष्ट्रीयन जनता करत नाही ,
*मनसे* च्या आंदोलनाचा परिणाम म्हणून परप्रांतीय लोकांच्या मनात हा गैरसमज रुजलेला आहे व हा समज देशाच्या ऐक्य व भारतीय असण्याच्या राष्ट्रीयत्वां च्या भूमिकेस बाधा आणणारा आहे ,,
असे मानणारा सुज्ञ वर्ग महाराष्ट्रात आहे त्यामुळे या प्रकरणावरून कोणीही महाराष्ट्राची बदनामी करू नये ,
हा भाग इथेच संपवून  मूळ विषया कडे जाऊ ,
बिहार राज्यातील  पुनिया या छोटेखानी ग्रामीण भागातील सुशांतसिंग होते ,,आपले शिक्षण मकेनिकल इंजिनियर चालू असताना ही त्यांना डान्स व अभिनयाचे वेड होते ,यामुळेच त्यांनी कॉमन वेल्थ च्या खेळाच्या मैदानात ही हा परफॉर्मन्स केला होता ,
बालाजी टेली फिल्म  ने त्याच्यातील अभिनय क्षमतेला ओळखून त्याचे कास्टिंग करून पहिल्यांदा  
*किस देश मे है मेरा दिल*
या टीव्ही सिरीयल मध्ये *प्रीत जनुजा*
ची भूमिका दिली 
*पवित्र रिशता*(pavitra dista) मध्ये मानव देशमुख यांची भूमिका त्यांनी साकारली 
*जरा नच के दीखला जा*
*भाग 2*
व  *झलक दीखला जा*
*भाग4*
यात ही ते सहभागी झाले 
*कोई पो छे*
*देशी रोमान्स*
*पी के*
*एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी*
*रफता*
*केदारनाथ*
अश्या  विविध सिनेमात त्यांनी काम केले ,,
स्वतः च्या अंगभूत हुशारी ,मेहनत,
आवड यामुळे ते इथपर्यंत पोहचले ,,
अश्या हरहुन्नरी व ज्यांना भवितव्य आहे उज्ज्वल भविष्य आहे त्यांनी अस अपघाती ,अकस्मात जाणे हे दुःखद व धक्कादायक आहे ,,
सुशांतसिंग ह्यांना डिप्रेशन होते व ते 6 महिन्या पासून उपचार ही घेत होते अशी ही बातमी समोर आली आहे ,,
साधारण वर्षभरा पूर्वी ते आपल्या गावी गेले होते , त्यांच्या वाट्याला आलेली पैतृक संपत्ती त्यांनी विकून टाकली होती व ते मुबंई ला आले होते ,,
त्यांचे वडील पाटणा मध्ये आहेत ,,व त्यांना ही या बाबीने धक्का बसलेला आहे 
अलीकडे समाजव्यवस्थेत प्रत्येक व्यक्तीला ह्या ताण तणावाला सामोरे जावे लागते ,हे वास्तव आहे ,आणि हा ताण तणाव विद्यार्थी दशेत ही असतो ,यास वयाचे बंधन नाही ,
मी येथे आमचे कॉलेज जीवनातील उदाहरण देऊ इच्छितो ,,
आमचे लॉ कॉलेज मध्ये ,बार्शीचे ऍड प्रवीण कुलकर्णी हे आत्यंतिक हुशार विद्यार्थी होते ,, शिवाजी विद्यापीठात ते प्रथम च असत ,
मोत्या सारखे अक्षर ,इंग्रजी भाषेवरील पकड ही त्याची जमेची बाजू होती ,,
या विद्यार्थ्यांचे कौतुक सर्व कॉलेज करत असे ,,आम्हांला मात्र याची कधीच असूया वाटली नाही ,,आम्ही बिनधास्त अश्या वर्गात मोडणारे विद्यार्थी होतो ,,शालेय जीवन व परीक्षा म्हणजे जीवन असे आम्ही कधीच मानले नाही ,पास नापास ह्या कसोट्या आमच्यासाठी गौण होत्या
,हैदराबाद येथील एक विद्यार्थी होता ,आणि या दोघातच हे कॉम्पिटेशन असायचे ,,
बाळी वेस येथील वालचंद हिराचंद कॉलेज मध्ये आमचे पेपर चालू होते ,
आम्ही साऱ्यांनी पेपर दिले ,व सर जेंव्हा त्या विद्यार्थ्या जवळ पेपर घ्यावयास गेले तेंव्हा तो विद्यार्थी मृत अवस्थेत झोपलेला होता ,दवाखान्यात त्याचे तपासणी अंती कळले की अति ताणा मुळे त्याचे मेंदूतील रक्तवाहिनी फुटली होती ,,
हे जीवघेणे तणाव व ईर्षा काय उपयोगाची?तसा ही तो विद्यार्थी विद्यापीठात 2 रा येतच असे ,,
आई वडिलांनी कलर टी व्ही आणला नाही म्हणून 10 वी तील विद्यार्थ्याने आत्महत्या केलेल्या मी पाहिल्या आहेत ,,
केस असे का वाढवलेस ?म्हणून वडिलांनी खवळले तरी आत्महत्या करण्या पर्यंत मुले जातात ,,उद्या 10 वि चा निकाल आहे मग  मला किती टक्के मार्क मिळतील म्हणून आत्महत्या करणारी मुले ही आम्ही पाहिली आहेत 


अलीकडील सामाजिक जीवन हे विभक्त कुटूंब पद्धत्तीचे जीवन आहे ,ग्रामीण भागातील शेती आधारित एकत्रित कुटूंब पद्धत कधीच मोडीत निघालेली आहे ,,प्रत्येक व्यक्ती स्व केंद्रित किंवा त्याचे मर्यादित कुटूंबा पुरती केंद्रित झालेली आहे ,,या कुटूंब उपजीविकेसाठी जीव तोड मेहनत ते करीत आहेत ,अश्या स्थितीत जर एका ही सदस्याने जर विश्वास घात केला तर सगळेच उध्वस्त होऊन जाते ,
व्यक्तीच्या गरजा अनंत आहेत आणि संतुष्टता हा स्थायी भाव राहिलेला नाही भौतिक चंगळवादी जीवन कितीही मनोहारी वाटत असले तरी त्याचे दुष्परिणाम ही तितकेच आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे ,,
मानवी जीवनात ताण तणाव येणे ही स्वाभाविक बाब आहे  प्रत्येक बाब ही आपल्या हातात नसते , आपण बनवलेले प्रत्येक प्लॅनिंग यशस्वी च होईल असे ही नसते ,,
आम्ही ही अश्या अनेक संकटाचा मुकाबला केला आहे ,,
देशातील शेतकरी वर्ग ह्या बाबी सातत्याने झेलतो आहे ,,शेती क्षेत्रातील अनिश्चितता ही गंभीर आहे ,,तिथे लाखाचे ही झिरो होतात ,,
पण आपण यावर मात केली पाहिजे ही अंतप्रेरणा आपल्या ठायी असली पाहिजे ,,
या ठिकाणी मी माझेच उदाहरण देतो बिगर शेती पतसंस्था चे 3 लाख रुपयांचे कर्ज घेऊन मी 8 एकर ऊस 2004 साली लावला ,
सामान्य परिस्थिती त हे कर्ज सहज फिटले असते परंतु त्या वेळेस पडलेल्या अभूतपूर्व दुष्काळाने संपूर्ण ऊस जळून राख होऊन गेला ,अनेक दिवस मी ही तणावात होतो ,जप्ती च्या भीतीत वावरत होतो ,साधी झोप ही दुर्मिळ झाली होती ,
एके दिवशी मी विचार केला 
*ही पृथ्वी निर्माण झाली तेंव्हा मी होतो का*
*आज जी जमीन माझ्याकडे आहे ती छात्रपती शिवरायांच्या काळात कुणाची होती*
*माझ्या नंतर ती माझे वारस जमीन कसतीलच हे मी सांगू शकतो का*
*आपण या पृथ्वीतलावर पाहुणे म्हणून आलोत*आपला मुक्काम संपला की आपणास निघावयाचे आहे*
खरे सांगतो तेव्हां पासून भीती हा शब्द माझ्या शब्द कोशात राहिलाच नाही ,,
  *डिप्रेशन याचा मराठीत अर्थ होतो नैराश्य*
हे नैराश्य आले की जीवनातील गोडी संपते ,जीवन जगणे निरर्थक वाटू लागते 
थोडेसे ही काम केले की थकवा जाणवतो व सुस्त पडून रहावे असे वाटू लागते ,नैराश्य ग्रस्त व्यक्तीला झोप येत नाही तो वारंवार कुस बदलत राहतो व विचार मग्न राहतो सातत्याने झोपेतून उठत राहतो ,
बारीक सारीक बाबीवरून चीड चीड होते ,,व ती व्यक्ती एकांतात राहणे पसंत करू लागते ,,माणसाना टाळण्याची प्रवृत्ती वाढते 
याचे ही पुढची पायरी म्हणजे जीवन संपवण्याचे विचार सुरू होतात ,हा काळ सर्वसाधारण पणे तीन ।महिने अगोदर असतो ,जवळच्या मित्राशी तो हे जीवन संपवून टाकावे अशी भावना व्यक्त करतो ,
माणसे ही बाब गांभीर्याने घेत नाहीत ,त्याच वेळेस  त्या व्यक्तीचे समुपदेशन झाले तर अनेक आत्महत्या टाळता येतात ,
कॉलेज जीवनात प्रेम प्रसंग व्यक्तीच्या जीवनात येतात ही बाब नैसर्गिक आहे ,यातील शारीरिक आकर्षण कितीव बौद्धिक किती हा भाग व याचे आकलन नसते ,अतिशय गांभीर्याने प्रेमाला घेतल्यास व पुढून धोका मिळाल्यास व्यक्ती आपले स्वतः चे आयुष्य संपवून घेते ,
सुशांतसिंग यांनी पैतृक संपत्ती विकणे याचा अर्थ त्यांनी त्याच्या मूळ मातीला दिलेली सोडचिठ्ठी आहे असे मला वाटते ,
नव्या जीवनाची सुरुवात ते करणार होते व नोव्हेंबर मध्ये त्यांचा विवाह होणार होता ,,
पाठीमागे त्याच्या पर्सनल असिस्टंट मुलीने 14 व्या मजल्यावरून स्वतः ला खाली फेकून देऊन जीवन यात्रा संपवली होती ,,
बॉलिवूड मधील असंख्य ताण तणाव तीव्र स्पर्धा आपणास परिचित असण्याचे कारण नाही ,पण अगदी विपन्ना अवस्थेत ही उद्याच्या अन्नाची शाश्वती नसलेला समाज ही जगतो आहे ,,
त्यामुळे सर्व सुख सोई असताना ही माणूस का आत्महत्या करतो हा प्रश्न अनेकांना पडतो 
याची अनेक कारणे असतात व या घटनेत नेमके कोणते कारण कारणीभूत असेल याचे अनुमान आपण बांधू शकत नाही ,,सुशांतसिंग यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना करणे आपल्या हातात आहे व ती आपण करू ,,



     तूर्त इतकेच ,,,,।


ऍड अविनाश टी काले 


अकलूज
9960178213
****************


Previous Post Next Post