Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

स्व कर्माने भाजपा गेली गर्तेत ,,,भारतीयांची विश्वासार्हता मोदी सरकारने गमावली

स्व कर्माने भाजपा गेली गर्तेत ,,,भारतीयांची विश्वासार्हता मोदी सरकारने गमावली


राजकारणात लाटा निर्माण करता येतात ,या लाटांच्या आधारे सरकार ही निर्माण करता येते ,परंतु लाटा कधीच शाश्वत नसतात ,,
उद्धवजी ठाकरे साहेब म्हणाले होते 
समुद्रात भरती येते तशीच आहोटी ही येते ,,
भाजपला गवसलेला सुपर ब्रँड नेता म्हणजे मोदी ,,
गोध्रा प्रकरणा नंतर संघ परिवाराच्या लक्षात आले की ज्यांचे आपणास दमन करावयाचे आहे ,ते साध्य करणारा नेता आपणास सापडला आहे ,म्हणूनच वरीष्ठत्वाचा नियम डावलत लालकृष्ण अडवाणी ना दूर सारत भाजपने मोदींच्या हातात सर्व सूत्रे दिली ,,
भाडवलंदार वर्गाने ही आपल्या थैल्या या नेतृत्वा साठी मोकळ्या केल्या ,,
भारतात संघटित प्रचाराद्वारे रान उठवण्यात आले आणि भाजपा हा बलाढ्य पक्ष म्हणून स्व बळावर केंद्रात स्थापित झाला 
भाजप व संघ परिवाराचा अहंकार इतका वाढला की आता 25 वर्ष तरी आम्ही सत्तेतून दूर जाणारच नाही ,
काँग्रेस कायमची संपली ,व राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या प्रादेशिक पक्षाचे अस्तित्व धुळीला मिळवत नॅनो पक्ष म्हणून त्याची हेटाळणी करण्यात आली ,,
सत्तेच्या माध्यमातून हाती आलेल्या शक्ती केंद्राचा वापर पूर्णतः करून अनेक नेतृत्वाच्या मागे ईडी  ,सि बी आय ,सारख्या संस्थांचे शुक्लकाष्ठ मागे लावले ,,
याच अहंकारातून महाराष्ट्रात भाऊ असणाऱ्या शिवसेनेला त्यांनी दाबण्यास सुरुवात केली ,,
सगळीकडे आक्रोश आणि वेदना चीड व संताप असतानाही भाजपने  खुबीने त्यावर मात करीत पुन्हां सत्ता स्थापन केली ,,
भाजपच्या पथ्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाचे गडगडलेले दर ही उपयुक्त ठरले परंतु त्या दरात कपात न करता त्यांनी आपली लूट चालूच ठेवली 
अंत्योदय योजने अंतर्गत 35 किलो दिले जाणारे गहू , तांदूळ कमी करीत आणले तरी ही जनतेने ते मुकाट पणे सहन केले ,,ह्या वाचलेल्या धान्याचे काय झाले?हा संशोधनाचा भाग आहे ,गहू तांदूळ कृत्रिम रित्या सडवून त्याचे इथेनॉल ,आणि बियर ही बनवली जाते असे लोक म्हणतात ,,
काँग्रेस च्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत असा दावा करणाऱ्या भाजपचे नागडे चित्र जनते समोर आले ,
ज्या 19 सांसद सदस्यांवर रेप सारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत त्या पैकी 10 सदस्य हे भाजपचे आहेत ,,
त्यातील एम जे अकबर ,कुलदीप सेगर ,चिन्मयानन्द  ही नावे पुरेशी बोलकी आहेत ,,
काल परवा हरियाणा मधील भाजपचे प्रमुख नेते चंद्रप्रकाश कथुरिया यांचे प्रकरण भलतेच प्रसिद्ध झाले ,मोदीजी दिवंगत नेत्या ,सुषमा स्वराज्य ,नितीन जी गडकरी ,राजनाथ सिंह अश्या मोठ्या नेतृत्वाच्या वर्तुळात राहणारा हा नेता कर्नाल मधील आहे ,आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी हे गेले आणि तेथे कोणी तरी आले म्हणून दुसऱ्या मजल्यावरून कापडाच्या गाठी मारून बनवलेल्या दोराच्या सहाय्याने उतरताना ती गाठ निसटली व वरून पडल्याने त्यांना पाय मोडून घ्यावा लागला तर त्या विवाहितेला तिचा संसार ,,।
कामातुरानाम ना भयं ना लज्जा ,,असे वचन आपल्याकडे आहे ,,
महाराष्ट्रात ही याच कर्तबगारीचे नेते भाजपने दिले ,,
कॉलेजच्या मुली पुढे बोलताना गिरीश बापट सारखा नेता ,पिकले पान असले तरी अजून माझा देठ हिरवा आहे असे म्हणत मी ब्लु फिल्म पाहतो असे म्हणाला ,,
तर राम कदम सारखा नेता ,तुम्हांला पसंत असलेली मुलगी मला दाखवा मी तिला पळवून आणून तुमचा विवाह तिच्याशी लावून देतो असे म्हणाला ,,
सारा भारत देश ज्या सैनिकांचे ऋण मान्य करतो त्या सैनिका बद्दल बोलताना भाजप चे विधान परिषद आमदार  प्रशांत परिचारक,
म्हणाले ,सैनिक 6/6 महिने सीमेवर राहतात आणि गावी मूल झाले म्हणून तेथे पेढे वाटतात ,,
पुलवामा सारख्या घटनेत 42 जवान हकनाक शहीद झाले पण भारतीय माणसांनी डबल स्टॅंडर्ड दाखवत त्या संबंधी भाजपा स साधा प्रश्न ही विचारला नाही ,, 
गो मासाच्या अफवा पसरवून अखलाख सारख्याना ठेचून मारले ,पहलू खान ला मारले ,,
गुजरात मध्ये वाल्मिकी समाजाचे लोक मृत गाईचे कातडे काढीत होते म्हणून त्यां चार लोकांना भर चौकात गाडीला बांधून मारले ,,एक घटना नाही तर अश्या अनेक घटना घडत होत्या ,, मारुतीच्या मंदिरात मागासवर्गीयांना प्रवेश बंद असल्याचे बोर्ड लावले गेले ,
जगन्नाथ पुरी सारख्या मंदिरात थेट राष्ट्रपतींना ते मागासवर्गीय आहेत म्हणून प्रवेश दिला नाही 
दास शूद्रांची गुलामगिरी या पुस्तकात  सत्यशोधक कम्युनिष्ठ पार्टीचे संस्थापक व प्राच्यविद्या संशोधक कॉम्रेड शरद पाटील ,जे आज हयात नाहीत त्यांनी म्हटले आहे की मनुवादया चा विरोध मुस्लिमाना असतो ,परंतु त्याचा शेवट दलितांच्या दमनात होतो ,,
भारतातील मुस्लिम दलित वर्गात भाजप प्रति भीती निर्माण झालेली होती ,तरीही समाजावर आपल्या आर्थिक सामाजिक शक्तीच्या आधारे प्रभाव टाकणाऱ्या उच्च वर्णीय नेतृत्वा पुढे ते हतबल होते ,,
याचाच फायदा घेत ,भाजपने नागरिक संशोधन बिल आणले , एन आर सि सारखे कायदे आणले त्यामुळे ही लोकात घबराट पसरली ,आसाम मध्ये साडे चौदा लाख लोक भारतीय नागरिकत्वाला मुकले गेले आणि त्याची रवानगी डिटेक्षण कॅम्प मध्ये केली गेली ,, आपण भारतीय नागरिक आहोत याचा पुरावा म्हणून 1947 पूर्वीचे महसुली पुरावे ,जन्मनोदी देणे कायद्याने बंधनकारक केले होते ,,
हे घडत असतानाच कोरोना भारतात आला 
30 जानेवारीला भारतात केरळ मध्ये पहिला रुग्ण आढळला असतानाही अहमदाबाद मध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रम आयोजित करण्यात आला ,फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ह्या कार्यक्रमासाठी देश विदेशात असलेल्या 27 हजार गुजराथी बांधवांनी हजेरी लावली ,ज्याच्या हातावर कॉरटाईन चे शिक्के होते परंतु त्यांना कोणीच अडवले नाही ,,असे भाजपचे पूर्व अर्थमंत्री विदेशमंत्री यशवंत सिन्हा यांनी एका मुलाखतीत सांगितले 
24 मार्चला घाईगडबडीत लॉक डाऊन पुकारला
केंद्र सरकारच्या लक्षात ही मूळ बाब राहिली नाही ती ही की कोट्यवधी स्थलांतरित मजुरांचे हाल काय होतील?किमान 4 दिवसाचा अवधी देऊन ह्या वर्गाला आपापल्या गावी जाण्यासाठी सांगितले असते तर ,त्यांच्या स्व खर्चा तुन ते निहित ठिकाणी पोहचले असते ,पहिल्या लॉक  डाऊन वेळी मुंबईतील कोरोना बाधित होते फक्त 368 लोक ,,जेव्हा या लोकांना जाण्याची परवानगी दिली तेंव्हा लाखो लोक संक्रमित होते
याच कोरोनाच्या अटकवासाठी सर्व राज्यांना केंद्राद्वारे सर्व प्रकारची संसाधने ,पुरवणे गरजेचे होते व आर्थिक बळ ही पुरवले पाहिजे होत ,परंतु तसे घडले नाही 
कोरोना ला राष्ट्रीय आपत्ती समजून स्वतः चा अहंकार व पक्षीय दृष्टिकोन बाजूला ठेवून सर्वपक्षीय मुख्यमंत्री ,अनुभवी नेते गण ,व वैद्यकीय आर्थिक तज्ञ याची राष्ट्रीय स्तरावर कमिटी बनवून तिच्या सल्ला मसलतीने निर्णय घेतले असते ,विरोधकांची टिंगल टवाळी करणे सोडून दिले असते तर त्यात अधिक शहाणपण दिसले असते ,पण ही बाब भाजप कडून घडूच शकत नाही  याचे कारण आज ज्यांच्या हातात नेतृत्व आहे ते फक्त मन की बात करतात ,इतरांचे मत आणि मन ते जाणत नाहीत व जाणण्याची त्याची इच्छा ही नसते ,म्हणूनच ज्यांनी 60 वर्ष सामाजिक राजकीय जीवनात घालवली ,स्व अटलबिहारी वाजपेयी च्या सरकार मध्ये ज्यांनी मानाची प्रमुख पदे भूषवली ते यशवंत सिन्हा सारखे नेते ,या परिस्थितीकडे पाहिले की मला रडू कोसळते असे म्हणतात तेंव्हा परिस्थिती खरोखरच बिघडलेली असते 
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधील 1 वर्ष पूर्ण झाले आहे या सरकारच्या कामगिरी वर जनतेचा कौल घेण्यात आला 
 ज्यात  न्यूज 24 चा सर्वे सांगतो भाजपचया बाजूने 41 % लोक आहेत ज्यांना सरकार उत्तम कामगिरी करते असे वाटते
6% लोकांना ती बरी वाटते 
तर 54 % लोकांना ती खराब आहे असे वाटते 
जे अर्णव गोस्वामी भाजपच्या बाजूने घसा फाटे पर्यंत ओरडत राहतात त्यांच्या रिपब्लिक भारत चॅनलच्या मते 43 % लोकांना भाजपचे काम चांगले वाटते 
तर 57 % लोकांना ते खराब वाटते 
दैनिक जागरण हे भारतातील प्रमुख दैनिक आहे त्यांनी केलेल्या सर्वे नुसार 
32 %  लोकांना भाजप चे काम आवडले 
66 % लोकांना ते खराब वाटले 
तर 2 % लोकांना काहीच माहीत नाही 
ऑनलाईन इंडिया च्या सर्वे नुसार भाजपला 21 % लोकांनी पसंती दिली  
तर काँग्रेस पक्षाला 73 % लोकांनी पसंती दिली 
फक्त 5 %लोकांना भाजप उत्तम वाटतो 
2 % लोक तटस्थ राहतात 
तर 93 % लोक भाजप विरोधी बनले आहेत ,,
हे का घडले?याचे कारण झारखंड ,बंगाल  
महाराष्ट्र राज्यात भाजप या सरकार विरोधात राजकारण करत आहे ,
3 कोटी लोकांना प्रति दिन वाहवून नेण्याची क्षमता असलेली रेल्वे नाममात्र चालवली जात आहे ,,
निर्मलाजी सीतारामन यांनी घोषित केलेले 20 लाख कोटीचे पँकेज लोकांना अविश्वसनीय वाटते ,,
माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा म्हणतात की 20 लाख म्हणता म्हणता तो आकडा 20 लाख 97 हजार कोटी कडे गेला ,, त्यातील ही 19 लाख कोटी ही भविष्यात दिली जाणारी कर्जे आहेत ,तर फक्त जी डी पी च्या जेम तेम  दीड % म्हणजे 2 लाख कोटी जी डी पी च्या हिश्श्यातून दिले जाणार आहे ,,
आदरणीय शरदचंद्र जी पवार साहेब यास लबाडा घरचे जेवणाचे आमंत्रण म्हणतात 
बोलाचा च भात बोलाचीच  कढी 
जेऊनिया सांगा कोण तृप्त झाला ?
अरुण शौरी ह्या प्रख्यात पत्रकारांनी म्हटल्या प्रमाणे प्लेट वाजतात ,भांडी ही वाजतात ,पण जेवण प्रत्यक्षात दिसत नाही ,
कसे दिसणार ?हे सरकार दिवाळखोर बनलेले आहे ,रिझर्व म्हणजे राखीव असलेला पैसा आणि लोकांची पेन्शन  प्रॉव्हिडंट फंड ,एल आय सि ज्यांना पुरली नाही  ते देश काय चालवणार?कर्जबाजारी असलेला देश चीन कडून ही दाबला जाणार आणि टीचभर नेपाळ ही त्यास गुरकाऊन पहाणार ,,
हे आहे मोदी सरकारचे अपयश ,,जे झाकल्याने झाकले जात नाही  
स्व कर्माने शिंदळ झाल्याने ह्या सरकारची विश्वासार्हता लोप पावली आहे ,,
तूर्त इतकेच ,,,।
****************


ऍड अविनाश टी काले


अकलूज 9960178213


Previous Post Next Post