Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात गरीब रुग्णांसाठी बेडचे आरक्षण

यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात


गरीब रुग्णांसाठी बेडचे आरक्षण


 


लातूर – लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकिय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात गोरगरीब आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांसाठी बेडचे आरक्षण ठेवून सोय करण्यात आली आहे. अशी माहिती एमआयएमएसआर वैद्यकिय महाविद्यालयाचे डॉ. एन. पी. जमादार यांनी दिली आहे.


          एम.आय.टी. वैद्यकिय महाविद्यालयाने सुरु केलेले यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय हे ग्रामीण भागातील गरजूंसाठी मोठे वरदान ठरले असून एम.आय.टी.चे कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णालयात सर्व प्रकारच्या आजारावर तज्ञ डॉक्टरच्या मदतीने उपचार केले जात आहेत. त्यामूळे लातूर शहर आणि ग्रामीण भागातून येणार्‍या सर्व प्रकारच्या रुग्णांच्या संस्थेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते.


          महाराष्ट्र शासनाच्या नियमानूसार निर्धन आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांसाठी या ग्रामीण रुग्णालयातील ८० टक्के म्हणजे जवळपास ५४० बेडचे ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत आरक्षित ठेवून गोरगरीब आर्थिक दुर्बल घटकातील सर्व सामान्यांना रुग्णसेवा देण्यात येत आहे अशीही माहिती एम.आय.टी.चे अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.  


Previous Post Next Post