Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

देशी दारूच्या 20बॉक्स सह दोन लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त.एक जन ताब्यात,सांगली जिल्ह्यातील कुरळूप पोलिसांची कारवाई...

देशी दारूच्या 20बॉक्स सह दोन लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त.एक जन ताब्यात


सांगली जिल्ह्यातील कुरळूप पोलिसांची कारवाई...


सांगली/प्रतिनिधि/एकनाथ कांबळे 



रणजित बाजीराव माने वय 27रा. बावची असे दारू वाहतूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सोमवारी दि.20जूलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान   


एक व्यक्ति अवैधरित्या दारू वाहतूक करणार असल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांना गोपिनीय माहिती मिळाली होती यावरून सांगली जिल्ह्यातील वाळवे तालूक्यातील कुरळूप गावामधील पोलिसांनी साफळा लावला असता सायंकाळी 7, 30वाजण्याच्या दरम्यान बावची वरून येडेनिपाणी मार्गे  शिराळाकडे जाणारी मारुती ओमनी गाडी क्र.MH10AN2970यागाडीची झडती घेतली असता 50हजार रुपये किमतीची देशी दारूचे वीस बॉक्स आढळून आले.यावरून पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता ही दारू बावचीवरून आणली असून लाडेगाव कार्वे व शिराळा येथे विक्री करणार असल्याचे चालक रणजित बाजीराव माने याने सांगितले.यावरून अवैध्य रित्या दारू विक्रीसाठी घेऊन जात असल्याची पो को दीपक शिंदे यांनी फिर्याद दिली असून.गाडीसह ऐकून दोन लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.  पुढील तपास पो.ह.संजय पाटील करीत आहेत. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता पर्यंत बारा वेळेस अवैध्य रित्या वाहतूक व अवैध्य धंद्यावर कारवाई करून आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. तर  पो. ना. अनिल पाटील asi सुदाम कोकितकर, पो. ना. भूषण महाडिक, पो. को. प्रमोद पाटील, पो. ना. सुरेश पाटील, पो. को. अर्जुन पाटील,यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला.


Previous Post Next Post