27 हजाराची लाच स्विकारताना वैद्यकीय अधिकारी एजाज शेखला रंगेहात पकडले
लातूरदि. 27जूलै (प्रतिनिधी) - तक्रारदार यांनी कार्यालयीन कामासाठी लागणारे स्टेशनरी साहित्य स्वतः खरेदी करुन त्या साहित्याचे व त्यांचे स्वतः चे प्रवास भत्त्याचे असे एकुण 27995/- रु.चे बिल मंजूर केले. म्हणुन आलोसे यांनी 27,995/-रु. लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम दिनांक 27/07/2020 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कासार बालकुंदा येथे स्वतः स्विकारली. लाच स्विकारताना आरोपी - एजाज इकबाल अहमद शेख वय 29 वर्षे, पद- वैद्यकीय अधिकारी, वर्ग-2, नेमणुक प्राथमिक आरोग्य केंद्र, कासार बालकुंदा ता. निलंगा जि.लातूर यांना लातूर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी (दि.27) रोजी रंगेहाथ पकडले. ही कारवाई TLO :- पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे SO :- पोलीस उपअधिक्षक माणिक बेद्रे, पोलिस निरीक्षक कुमार दराडे, लातूर ACB टीम यांनी केली.