रस्त्यावरची हागणदारी पाहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रण देऊन आणून दाखवणार.
-- व्यंकटराव पनाळे
लातुर : दि. २३ - हागणदारीमुक्त गावचा फलक लावुन नुसतेच दवंडी वाजवत गावात फिरणाऱ्या आणी स्वच्छतेचा केवळ नारा मिरवणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार आणी रस्त्यावरची हागणदारी दाखवण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. जि. श्रीकांत आणी जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिनव गोयल यांना गावात येण्याचे निमंत्रण देणार असल्याचे व हागणदारी मुक्त गावाचे विलोभनीय दृश्य पाहणी दौऱ्याचे व्हिडीओ चित्रीकरण करणार असल्याचे हरंगुळ (बु) गावचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. रस्त्यावरची वाढत चाललेली हागणदारी सर्वानाच दिसून येत आहे. नागरिक मात्र नुसतेच तिकडं बघा हो ची मागणी करत असून सध्या रोगराई वाढल्याने या घाणीच्या साम्राज्यावर तात्काळ कार्यवाही करावी. अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून सगळीकडे नाल्या तुंबल्या आहेत. कांही ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन वरपांगी साफ सफाईचे नाटक करते. परंतु कांही ठिकाणी त्यांना घाणीचे साम्राज्य डोळे असूनही दिसून येत नसल्याने नागरिकातून याबाबत उलट सुलट चर्चा चालू आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना हरंगुळ येथे आणून रस्त्यावरची हागणदारी दाखवाणार असल्याचे व तसे संबंधितांना जाहीर निमंत्रण देणार असल्याचे हरंगुळ (बु) गावचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे यांनी सांगितले आहे. प्रशासनाला आणून दाखवलेच पाहिजे अशी आपापसात लोक चर्चा करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हरंगुळ गावात मंदार विभागात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला तरी हरंगुळ ग्रामपंचायतची स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंबच आहे. नागरिक मात्र हैरान झाले असून कोरोनाचे भीतीने ग्रस्त झाले आहेत. हागणदारीमुक्त फलक लावल्याचा आणि स्वच्छतेचा नारा दिल्याचा ग्रामपंचायतला विसर पडल्याचे पहावयास मिळत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना सर्दी खोकला पडसे अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने साफसफाईसाठी तात्काळ कार्यवाही नाही केल्यास गावात रोगराई पसरू शकते. ऐन पावसाळ्यात घाणीचे साम्राज्य आणी कोरोना माहामारी अशा दुहेरी संकटात हरंगुळ गावचे गावकरी सापडले आहेत.