३० जुलै पासून नवम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनास प्रारंभ !
लातूर येथील अधिवक्ता आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवेशनात ‘ऑनलाईन’ पद्धतीने सहभागी होणार !
लातूर - हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ ३० जुलै ते २ ऑगस्ट आणि ६ ते ९ ऑगस्ट २०२० या कालावधीत होत आहे. यापूर्वी झालेली सर्व अधिवेशने गोवा येथे घेण्यात आली. या वर्षी मात्र कोरोनाचे संकट असल्यामुळे हे अधिवेशन ‘ऑनलाईन’ पद्धतीने घेण्यात येणार आहे. यासमवेतच ‘हिंदु राष्ट्र संघटक अधिवेशन’ १३ ते १६ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. आजवर झालेल्या आठ अधिवेशनांना प्रतीवर्षी मिळणारा प्रतिसाद वाढत जाऊन अष्टम् ‘अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशना’ला २५ राज्यांतील एकूण १७४ हिंदु संघटनांचे ५२० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. या अधिवेशनांचे वैशिष्ट्य म्हणजे भारताशिवाय नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, बांगलादेश येथूनही हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातही देश-विदेशांतून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते, कार्यकर्ते, अधिवक्ते, विचारवंत, संपादक, उद्योगपती यांसह लातूर येथील आधिवक्ता राहूल मातोळकर, अधिवक्ता सचिन रणखांब, शेतकरी संघटनेचे बालाजी जाधव, तसेच निखील नल्ले, अजय धुमाळ, नंदकुमार अगरवाल, दिनेश मित्तल, कैलाश गिरवलकर, मुखेड येथील विरुपाक्ष शिवाचार्य स्वामी हेही ‘ऑनलाईन’ पद्धतीने सहभागी होणार आहेत, अशी माहिती लातूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, हिंदु संघटना आणि संप्रदाय यांनी राष्ट्रहित अन् धर्महित यांसाठी योगदान देणे, तसेच भारत हे हिंदु राष्ट्र म्हणून उद्घोषित करणे या सूत्रांच्या अनुषंगाने विविध विषयांवर सखोल चर्चा करणे, समान कृती कार्यक्रम ठरवणे आणि हिंदुहिताचे ठराव संमत करणे, हे या ‘ऑनलाईन’ अधिवेशनाचे स्वरूप असेल. यापूर्वीच्या आठही अधिवेशनांत निश्चित झालेल्या समान कृती कार्यक्रमाला लाभलेली पुढील ठळक यशस्विता आपल्याला सांगतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांतून प्रेरणा घेऊन भारतातील अनेक राज्यांत आतापर्यंत अनेक राज्यांत एकूण १२१ प्रांतीय अधिवेशनांचे यशस्वी आयोजन करण्यात आले, हिंदु धर्म आणि धर्मीय यांच्या रक्षणासाठी कार्यान्वित हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून देशभरातील ५०० हून अधिक धर्मप्रेमी अधिवक्त्यांचे संघटन आणि त्यान्वये हिंदूहिताच्या भरीव कार्यास यश लाभले, प्रतिमास राष्ट्र आणि धर्म यांवर होत असलेल्या आघातांच्या विरोधात गेल्या ७ वर्षांत देशभरात १७०० हून अधिक राष्ट्रीय हिंदू आंदोलनांद्वारे व्यापक जागृती करण्यात आली, उद्योगपती परिषदेची स्थापना आणि त्यांतर्गत विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले, अधिवेशनाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या ‘आरोग्य साहाय्य समिती’ने आरोग्याशी निगडित सर्व क्षेत्रांतील अपप्रकारांच्या विरोधात जनजागृती करण्यासमवेतच त्या विरोधात सरकारदरबारी तक्रारी करणे आदींच्या माध्यमातून लढा उभारला, अधिवेशनात स्थापन झालेल्या ‘राष्ट्रीय पत्रकार मंच’च्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म कार्याप्रती आत्मीयता असलेल्या पत्रकारांचे संघटन, धार (मध्यप्रदेश) येथे ‘भोजशाळा मुक्ती आंदोलन’ आणि ‘तिरुपति पवित्रता-रक्षा आंदोलन’ यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले, बांगलादेशात होत असलेल्या गोतस्करीच्या विरोधात बंगालच्या सीमावर्ती क्षेत्रांमध्ये हिंदुत्वनिष्ठांकडून संघटित प्रयत्न करण्यात आले, अधिवेशनाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या सहभागाने ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत चालू घडामोडींविषयी विशेष ऑनलाईन परिसंवादांचे आयोजन करण्यात आले, या परिसंवादाच्या माध्यमांतून देशभरातील लक्षावधी लोकांमध्ये जागृती झाली, हिंदुत्ववादी संघटनांकडून एकत्रितपणे ‘मंदिर-संस्कृती रक्षण अभियान’ या नावाने आयोजित विविध बैठका आदींच्या माध्यमांतून जनजागृती चळवळ उभारण्यात आली आहे.
आपला विनीत,
श्री. राजन बुणगे, जिल्हा समन्वयक,
हिंदु जनजागृती समिती, लातूर (संपर्क क्र. ९७६२७२१३०४)