धक्कादायक!
महापालिकेच्या कंटेन्टमेंट झोन उभारणीमध्ये मोठा भ्रष्टाचार !!
मनपाचा अज्ञानपणा ः महापौर, उपमहापौरांना खर्चाचा अंदाज काही येईना ...
लातूर दि.27जूलै2020
नेमका कंटेन्टमेंट झोन कशा पध्दतीने चालू आहे? शहरामध्ये केसेस का वाढत आहेत?, याची कारणे शोधण्यासाठी प्राथमिक स्वरूपात प्रभाग क्र.18 ,प्रभाग क्र.6, प्रभाग 11 आणि प्रभाग 13 मधील दहा कंटेन्टमेंट झोनची पाहणी केली असता कंटेन्टमेंट झोनमध्ये कोणी कर्मचारी बसून नाही. एका होमगार्डला 5 कंटेन्टमेंट झोनची जबाबदारी दिली गेली आहे. तरीही कंटेन्टमेंट झोन सील केलेल्या भागातून नागरिक सहज ये-जा करीत आहेत. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे कंटेन्टमेंट झोन सील करण्याचा उद्देश तर पूर्ण होतच नाही, परिणामी या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अपहार सुरू असल्याचे आयुक्तांच्या लेखी पत्रावरून समोर आले आहे.
महानगरपालिकेकडून सध्या प्रत्येक कंटेन्टमेंट झोनसाठी 8,000/- रुपये कॉन्ट्रॅक्टरला दिले जातात.(सुरूवातीला कंटेन्टमेंट झोन 300 रुपये फुट या दराने देण्यात आले होते.) परंतु या दहा कंटेन्टमेंट झोनची पाहणी केली असता असे समोर आले की,बांबू आणि ताडपत्रीने हे कंटेन्टमेंट झोन सील केले गेले आहेत, त्याचा खर्च अंदाजे एक हजार रुपयापेक्षा सुद्धा जास्त नसावा आणि म्हणून प्रत्येक कंटेनमेंट झोन उभारणीमध्ये पैसे मारण्याचे काम सध्या महापालिकेकडून चालू असल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे शहरातील एक दोन नव्हे तर सर्व 297 कंटेन्टमेंट झोनची सखोल चौकशी करून होणारा भ्रष्टाचार थांबवावा आणि खर्या अर्थाने पारदर्शक कारभार करून होणार वायफळ खर्च टाळावा. अशी मागणी मनपा कार्यक्षेत्रातील नागरिकातून केली जात आहे.
झोनच्या नावाखाली अपहार
करणार्यावर कठोर कारवाई करा
शहरात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी 297 ठिकाणी कंटेन्टमेंट झोन उभारण्यात आले. परंतु यावर तोकडा खर्च लागत असतानाही जास्तीचा खर्च दाखवून कंटेन्टमेंट झोन उभारणीमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महानगरपालिका आयुक्तांनी याचा सखोल चौकशी करून झोनच्या नावाखाली अपहार करणार्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी केली आहे.