खाजगिकरणाच्या दिशेने जाणारी सुसाट बुलेट ट्रेन
समाजावरील त्याचे दुष्परिणाम
लोखंडाचा रॉड एका टोकाला तापवण्यास सुरुवात केली की त्याचे चटके थेट अग्नीत नसलेल्या भागातील रॉड ला ही बसू लागतात , याचे कारण उष्णता वहन करण्याची क्षमता धातूच्या आतमध्ये असते
या उलट लाकडाचे असते ते समोरून पेटलेले असले तरी जो पर्यंत हाता पर्यंत ते जळत नाही तोवर त्याचे चटके हाताला बसत नाहीत
भारतीय जनता वा समाजाचे असेच चित्र आहे ,तो काल्पनिक जगतात वावरतो ,आणि मूळ मुद्य्या बाबत गंभीर कधीच नसतो
समाजात असलेल्या विविध जाती व धर्म आणि भाषा प्रांत अभिमान व त्यातील एकमेकांवरील कुरघोड्या याने तो संतुष्ट असतो ,
आरक्षण विरोधी धोरण आखणारा पक्ष त्यास हिरो वाटू लागतो ,तर अल्पसंख्याकांना दडपणारा पक्ष सुपर हिरो ठरतो व त्यातून अश्या पक्षाचे समर्थन करणारा वर्ग समाजात निर्माण होतो
आमच्या भागातील श्रीनिवास कदम पाटील नावाचे पत्रकार आहेत ,व त्यांचा ग्रामीण भागातील म्हणी वा वाक्यप्रयोगात बराच हातखंडा आहे
त्यांनी एक म्हण मला सांगितली होती
*नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे*
अशी गत समाजाची झाली आहे ,फक्त आरक्षण संपले पाहिजे म्हणून सर्वच सरकारी उपक्रमाचे खाजगीकरण केले जात आहे
आणि ह्याची व्याप्ती इतकी वाढली आहे की आता समाजव्यवस्थेतील कोणताही विभाग याने बाधित झालेला नाही असे नाही
सार्वजनिक उपक्रमा मध्ये गुणवत्ता नसते ,व हे उपक्रम तोट्यात जातात याचे कारण दर्शवत गुणवत्ता सुधार आणि उत्त्पन्न निर्मिती ही कारणे दाखवून हे खाजगीकरण केले जाते आहे
व समग्र समाज एक तर निद्रिस्त आहे ,किंवा तो यावर गप्प बसलेला आहे , याचे कारण त्याचे कायमस्वरूपी गंभीर परिणाम त्यांचे पुढील पिढ्यावर व खुद्द त्याचेवर ही काय व कितपत होणार आहेत याची त्याला कल्पनाच नाही
*उंदराच्या सापळ्यात ठेवलेले अमिष खात उंदरे निवांतपणे खेळत असतात*
तसे समग्र समाजाचे झाले आहे
*आणीबाणीच्या काळात स्व इंदिराजी गांधी यांनी खाजगी बॅंकेचे राष्ट्रीयीकरण केले*
या उलट आजचे सरकार राष्ट्रीय कृत बॅँक गिळंकृत करीत त्याचे खाजगीकरण करीत आहे
आमचे सहकारी *सुनील पाठक*
यांनी ऑन लाईन
*लोकमत*
21 जुलै 2020 मधील बातमीपत्र पाठवले जी बातमी धक्कादायक आहे
घटनाकारानी केंद्र सरकारकडे कोण कोणते उद्योग असावेत याची यादी दिली होती त्या नुसार ,
संरक्षण, दळणवळण
बँक,पोस्ट सेवा रेल्वे ,खनिज ,विमा शिक्षण ,आरोग्य सेवा ,वीज ,पाणी ,
खनिज तेल व गॅस आदी क्षेत्र सरकारच्या ताब्यात असावीत व ती सरकारी उपक्रमाच्या माध्यमातून *कल्याणकारी स्टेट*
संकल्पनेतून चालवावीत
*भारतीय घटनेने दिलेला शिक्षणाचा मौलिक अधिकार*
हा शिक्षण विभाग जोवर शासकीय आहे तोवरच अस्तित्वात राहतो
त्याची सक्ती खाजगी शाळा वर करता येत नाही , तिथे शिक्षण घेण्यासाठी तुम्हांला त्यांनी आकारलेली भली मोठी फी द्यावीच लागेल ,ज्याला
*डोनेशन*
असे म्हणतात
भारत सरकारचा उपक्रम म्हणून 8 सरकारी विमा कंपन्या आहेत यातील फक्त
एल आय सि ही कंपनी व 1 नॉन लाईफ इन्शुरन्स कंपनी स्वतः कडे ठेवून इतर कंपन्यांचे खाजगीकरण करणार आहे
तर
*कोरोना*
मुळे आर्थिक स्थिती खालवल्या मुळे देशात 5 पेक्षा अधिक बँक नकोत असे आर बी आय व नीती आयोगाला वाटते त्यामुळे अनेक बँक बंद होतील या शिवाय बँक ऑफ इंडिया
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
इंडियन ओव्हरसिज बँक
युको बँक
बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब अँड सिंध बँक
यातील मोठा सरकारी हिस्सा खाजगी भाडवलंदारांना विकण्यात येणार आहे ,
यातील खाजगी भाडवलंदाराच्या गुंतवणुकीमुळे त्या बँकांची धोरणे ठरवणे ,नोकर भरती ,इत्यादी चे हक्क त्याच भाडवलंदाराकडे वर्गीकृत होतील
*शंभुकुमार यांचे नॅशनल दस्तक नावाचे यु ट्यूब चॅनल आहे*
*त्यांनी या यु ट्यूब वरून काही वृत्तपत्रातील बातम्यांची कात्रणे दाखवली*
*ज्यात दक्षिण पूर्व रेल्वे डिव्हिजन मधील*
*3681*
*पदे आजमितीला नष्ट झालेली आहेत*
*रेल्वे खाजगी उद्योजक ,व विदेशी कंपन्या चालवतील*
प्रत्येक रेल्वे स्टेशन व्यवस्थापनासाठी खाजगी उद्योजका कडे
*75*
कोटी रुपयांच्या मोबदल्यात सोपवली जातील
*एअर लाईन्स ने 5 वर्षासाठी आपल्या कामगारांना सुट्टीवर पाठवलेले आहे*
*बी एस एन एल*
मधील अनेक कामगार आज नोकरी गमावण्याच्या दडपणाखाली आहेत
*हे खाजगीकरण शैक्षणिक क्षेत्रात
मेडिकल इंजिनियरींग ,नर्सिंग,
डी एड, बी एड,
आदी सर्व विभाग व्यापून राहिले आहे ,
अनेक विनाअनुदानित खाजगी शाळा व कॉलेज मधील शिक्षक ,प्राध्यापक ,व अगदी प्राचार्य ही इतके कमी वेतन मिळवतात की ज्याची कल्पना बिगाऱ्याच्या उत्पन्नाशी ही करता येत नाही
हजार बाराशे च्या व थोडा उदारमतवादी संस्था चालक असेल तर 2 हजार वेतन देत आहे ,आणि ह्या बुक्क्यांचा मार त्यांना सांगता ही येत नाही व सहन ही होत नाही अशी केविलवाणी स्थिती या वर्गाची फक्त खाजगिकरणा मुळे झाली आहे
*या खाजगिकरणाच्या पापाचे धनी फक्त मोदीजी नाहीत
तर याची सुरुवात पी व्ही नरसिंहराव ते मनमोहनसिंह सरकारच्या काळापासून सुरू झाली आहे
आपले सरकार कल्याणकारी राज्याची जबाबदारी तुन मुक्त होऊ पहात आहे , व त्यामुळेच अगदी संरक्षण क्षेत्रात ही खाजगी भाडवलंदाराचा शिरकाव झालेला आहे
या मुळे
*आरक्षित दलित वर्गावर च परिणाम होईल या भ्रमात बहुतेक लोक आहेत*
म्हणून ते या खाजगी करणा ला विरोध करीत नाहीत
परंतु ते हे विसरतात की आज सर्वच पातळीवर विषमता इतक्या टोकाला पोहचलेली आहे की त्यामुळे व मुक्त बाजारपेठ स्पर्धे मुळे सवर्ण समाज ही प्रभावित झालेला आहे ,
तसे नसते तर शेती क्षेत्रातील
*मराठा*
समाजातील आत्महत्या वाढल्या नसत्या
*दलित वर्गातील लोक आपले जगणे चालू ठेवण्याच्या शर्यतीत मिळेल ते काम करून जगतात ,अगदी सफाई काम ही करतात ,ते करण्याची मुभा किंवा मानसिकता सवर्ण समाजाची नसते
भारतातील 6 हजार 640 जाती पैकी काही जाती ह्या ओबीसी आहेत व ज्याचे उद्योग गाडगी मडकी बनवणे सुतार काम लोहार काम करणे अश्या स्वरूपाचे आहे ,
या धंद्यावर ही आज या मुक्त व्यापार व भाडवलंदारी उद्योगाने अतिक्रमण केले आहे ,त्यांच्या मुलाची उच्च शिक्षण व नोकरीच्या संध्या ही या खाजगी करणाने गोठवलेल्या आहेत
अगदी गरीब प्रवर्गातील सवर्ण समाजाची मुले मुली ही खाजगी मेडिकल वा इंजिनियरींग कॉलेज मध्ये ऍडमिशन घेऊ शकत नाहीत ,
5 ते 6 हजारावर काम करणारे कुटुंब प्रमुख आपल्या अपत्यांना इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये शिकवू शकत नाहीत हे वास्तव आहे व ते स्वीकारण्याची तयारी समाजाची नाही ,
यावर आपत्ती म्हणून कोणी बोलत नाही
कम्युनिष्ठ पक्ष ही या कडे डोळेझाक करून बसले आहेत
तर ,फक्त अस्मिता आणि श्रद्धेच्या खेळात समाजाला गुंतवले जात आहे ,
फुटकळ आंदोलने हा आपल्या जीवनाचा भाग झालेला आहे दुधाला किती दर द्यावा यावर रान पेटवले जाते ,पण दूध निर्माण करणाऱ्या घरात किमान नियमित उत्त्पन्न स्रोत निर्माण व्हावा म्हणून कोणी संघर्ष करीत नाही दर कमी जादा करणे हा भाग तत्कालिक दृष्ट्या परिणामकारक असू शकतो परंतु तो स्थायी कधीच नसतो
कामगार कायद्यात बदल करून कामाचे तास 12 तासांवर नेणे
कामगार भरती करताना ती पर्मनंट तत्वावर न करता 3 वर्षाच्या अस्थायी स्वरूपात करणे ,ह्या सर्व शोषणाच्या पद्धती आहेत ,,
भाडवलंदारांना संरक्षण तर श्रमिकांच्या पाठीत लाथ घालणारी ही धोरणे आहेत
आणि दुर्दवाने यावर गंभीरपणे चर्चा केली जात नाही
*सवर्ण समाजातील राज्यकर्त्यांनी त्याच्या70 पिढ्या बसून खातील व ऐशारामी जीवन जगू शकतील अशी संपत्ती जमवलेली आहे*
*या वर्गाला मानसिक शांती साठी कांही तरी अध्यात्मिक हवे आहे*
*पण समाजात असा ही वर्ग आहे ज्याला दोन वेळच्या अन्नाची चिंता आहे*
असा वर्ग फक्त दलित नाही ,आदिवासी नाही किंवा भटका विमुक्त नाही
तर त्यात ओबीसी व सवर्ण समाज ही आहे ,ज्याचे कडे पुर्वजाची विपुल संपत्ती नाही जमीन जुमले ,नाहीत वा मुबलक भाडवल नाही ,ते सारे ह्या चक्रात पिसले जाणार आहेत
*श्रद्धा आणि व्यवस्था याचे समीकरण किंवा तुलना अनाठायी आहे*
*ती प्रासंगिक वाद निर्माण करते , व मूलभूत बाबी कडून आपले लक्ष विचलित करते*
*या देशात राममंदिर उभे रहावे पण त्याच समवेत*
*कोट्यवधी भारतीयांच्या जीवनात स्थैर्य ,शांती, प्रगती ही निर्माण व्हावी*
*कोट्यवधी बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे व त्यांच्या श्रमाचे शोषण कुणी ही मुक्त पणे करू नये*
*किमान त्यास इतका मोबदला मिळावा की तो त्याचे सह कुटूंब जगवू शकेल व उद्याची पिढी सर्व बाबीने समृद्ध व पूर्ण विकसित क्षमतेची बनवेल जी जगाच्या प्रत्येक मुक्त आव्हानाचा मुकाबला करू शकेल*
*जीवन यासच म्हणतात ना?*
तूर्त इतकेच,,,,!
******
ऍड अविनाश टी काले ,अकलूज
डॉ आंबेडकर चौक
ता:- माळशिरस
जिल्हा:-सोलापूर
9960178213