Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

नांदगाव येथील मुकुंदराज विद्यालयाचे बारावी बोर्ड परीक्षेत यश

नांदगाव येथील मुकुंदराज विद्यालयाचे बारावी बोर्ड परीक्षेत यश


कु.संयोनी जाधव



दत्तात्रेय पवार



कु.सितूजा पवार



कु.पल्लवी काळे



लातूर, दि. 17 – बारावी बोर्ड परीक्षेत नांदगाव येथील माईर एमआयटी पुणे संचलित मुकुंदराज उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवित यश मिळवले असून या विद्यालयाचा बारावीचा 95 टक्के निकाल लागला आहे.


मुकुंदराज विद्यालयातील कला शाखेतून एकुण 60 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 12 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, 23 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 22 विद्यार्थ्यांनी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण होवून यश मिळवले असून एकुन 57 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यालयातील बारावी कला शाखेचा 95 टक्के निकाल लागला आहे.


कला शाखेतून कु. संयोनी भाऊसाहेब जाधव 90.15 टक्के गुण मिळवून प्रथम, कु. पल्लवी गोविंद काळे 85.23 टक्के व्दितीय, कु. सितुजा अनंतराव पवार 83.53 टक्के तृतीय तर दत्तात्र्य रामराव पवार याने 83.07 टक्के गुण मिळवले आहेत.


बारावी परीक्षेतील सर्व उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुकुंदराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. हनुमंत कराड, मुख्याध्यापक श्री एस.जी. मुंढे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांनी केले आहे.


Previous Post Next Post