Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पत्रकारितेची अंता कडील वाटचाल...

पत्रकारितेची अंता कडील वाटचाल....


लोकशाही व्यवस्था ही चार खांबावर तोलून धरलेली असतात असे म्हणतात 
भारतीय लोकशाही
कायदेमंडळ प्रशासन न्यायपालिका
व वृत्तपत्र (पत्रकारिता)यावर तोललेली आहे असे मानले जाते 
*निवडणुकीतील मतदान प्रक्रियेनंतर अधिकृत शासक सत्तेवर येतात व हे शासक सरकारच्या धोरणाची आखणी करतात ,
त्यांनी पारित केलेल्या धोरणाची अंमल बजावणी प्रशासन करते , परंतु ती धोरणे संविधानिक चौकटीत आहेत की नाहीत याचे परीक्षण न्यायालयिन व्यवस्था करते 
या दरम्यान जनतेचे मत व त्यातील विविध प्रकारची मत मतांतरे मांडण्याचे काम वृत्तपत्रे ,किंवा प्रसार माध्यमे करत असतात ,
या अर्थाने या व्यवस्थेचे मूल्य  लोकशाही व्यवस्थेत किती महत्वपूर्ण आहे याचा अंदाज यावा ,
वृत्तपत्राच्या किंवा प्रसार माध्यमाच्या जगतात शोध पत्रकारिता करून अनेक स्टिंग ऑपरेशन करून किंवा माहिती अधिकाराचा वापर करून आवश्यक ती माहिती जनतेला पुरवण्याचे काम प्रसार माध्यमे करतात ,तेव्हा नकळत पणे ती शासन यंत्रणा प्रशासन यंत्रणा यावर आपला अंकुश ठेवत असते  व कोणतेही पाप ती जनहीता साठी उजागर करीत असते ,
अश्या अनेक शोध पत्रकारिते मुळे व्यवस्थेत *तहलका*
माजतो आणि वातावरण ढवळून निघते ,
यातून निर्माण झालेल्या वादळाने ,सत्तेची तख्त पालटवली आहेत व सत्ता ही निर्माण केल्या आहेत 
*शिवसेनेच्या मुखपत्र "सामना''मधील ब्रीद म्हणून एक शेर लिहलेला आहे*
*खिचो न कमान को* 
*ना तलवार निकालो*
*जब तोफ मुकाबिल हो*
*तो अखबार निकालो*
इतकी शक्ती वा ताकद वृत्तपत्रात होती ,, 
मार्मिक च्या माध्यमातून शिवसेना आकारास आली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही 
*रशियन क्रांतीच्या मुळाशी ,मार्क्सवादी तत्वज्ञान जरूर असेल ,पण याचा पाया घातला तो *म्याम्क्झिम गोरकी*
यांच्या *आई*
ह्या कादंबरीने 
याचे कारण वृत्तपत्रे असोत वा वैचारिक पुस्तके किंवा कादंबऱ्या यातील विचारमंथना मुळे समाजमन घडते आणि हवा तो बदल समाजव्यवस्थेत घडवण्यास तो सहाय्यभूत ठरतो 
अकलूज सारख्या ग्रामीण भागात छोट्याश्या साप्ताहिका पासून आम्हीं सुरुवात केली  त्यानंतर ,आमची टीम उभा राहिली आणि त्यातून 8 पानी कलर प्रिंट असलेले दै महापर्व आम्ही छापू लागलो 
अर्थात ,त्यानंतर अधिकची आव्हाने आम्हांला झेलावी लागली ,खर्च व उत्त्पन्न याचा मेळ लागेनासा झाला ,याचे कारण वृत्तपत्राला आर्थिक मजबूत आधार नसण्यात होता ,तसेच हा आधार फक्त राजकीय नेतृत्वा कडूनच ग्रामीण भागात मिळत असल्या मुळे यातील मर्यादा ही उघड झाल्या,
ह्याची सुरुवात 2014 नंतर सुरू झाली ,,व नोट बंदी नंतर ही प्रक्रिया अधिक गतिमान झाली 
आमचा जीव छोटा होता म्हणून आमचा जीव लवकर गेला ,
पण ही नांदी होती वृत्तपत्र मृत्युमुखी पडण्याची ,
त्या नंतर आर्थिक दृष्ट्या सबळ असणारी वृत्तपत्रे ही संकोचत गेली ,व अनेकांनी आपली वृत्तपत्रे छपाई एकतर मर्यादित संख्या वर आणली किंवा ती बंद पडली 
हे वास्तव भारतात अधिक गडद व अधिक भयावह अश्या  स्वरूपात प्रगट झाला ,
हिंद व्हाईस या  
 यु  ट्युब चॅनलने या बाबीचा ऊहापोह नुकताच केला आहे 
को व्हिडं 19 च्या महामारी च्या काळात जगभरात 187 पत्रकाराचे मृत्यू झालेले आहेत 
पण जगभरात भारत वगळता कोणत्याच देशात पत्रकारांनी आत्महत्या केलेल्या नाहीत ,भारतात 10 पत्रकारांनी आत्महत्या केल्या आहेत ,
परवा दैनिक भास्कर मधील पत्रकार
*तनुष सिसोदिया*
यांनी एम्स रुग्णालयाच्या 4 त्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली 
तेलगू टीव्ही वर काम करणारे *मनोज*
हे कोव्हिडं पॉझिटिव्ह निघाले त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले ,पण तेथे उपचारात होत असलेली हेळसांड व दुर्लक्ष पाहून ते आक्रोश मांडू लागले , मला खाजगी दवाखान्यात उपचारास घेऊन चला ,पण हे झाले नाही व 8 जून ला त्यांनी हे जग सोडले 
 मुबंई च्या शासकीय रुग्णालया द्वारे मृत झालेल्या रुग्णा च्या मृत देहाच्या ही आदला बदली केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार ,
*भाजपच्या किरीट सोमय्या* यांनी उघड केला आहे
सोनवणे यांच्या कडे गायकवाड यांचा मृतदेह सोपवण्यात आला तर गायकवाड कुटूंबिया कडे तर गायकवाड कुटूंबिया कडे सोनवणे यांचा
वास्तविक या प्रकारच्या बातम्या किंवा व्यवस्थेतील ढिसाळपन माध्यमांनी उजागर करावयास हवे पण हे काम राजकीय नेतृत्वाना करावे लागत आहे
सॅटेलाईट द्वारे एकमेकांना कनेक्ट असणारी मोठी *262*  एडिसन ज्यात टेलिग्राफ ,हिंदू सारखी वृत्तपत्र समूह आहेत ती बंद पडली आहेत
*315* म्यागेझीन जी बातमी  किंवा साहित्य देणारी बंद पडलेली आहेत
*512*
म्यागेझीन ने आपली छपाई थांबवली आहे व ही म्यागेझीन  ऑन लाईन किंवा डिजिटल टेकनोलॉजी चा वापर करून ,वाचता येणार आहेत 
 या वरून एक बाब स्पष्टपणे पुढे आलेली आहे की ,कागदी प्रिंट मीडिया बंद किंवा औट डेटेड झालेला आहे ,,
या शिवाय या माध्यमांनीसरकार व भाडवलंदारी  शक्ती पुढे शरणागती पत्करल्याने किंवा लोटांगण घातल्या मुळे  स्वतः हुन ह्या व्यवस्थेची वाटचाल मृत्यूशय्ये च्या दिशेने सुरू झाली होती,
गौरी लंकेश सारख्या पत्रकाराची हत्या झाल्या  नंतर ही  पत्रकारातील दुफळी मुळे कांही जणांनी निर्लल्ज पणे या ही हत्येचे समर्थन केले 
पण या हुन ही गंभीर बाब म्हणजे समाज या हत्येवर मूक बनून राहिला 
आजची प्रसारमाध्यमे सरकारला प्रश्नच विचारत नाहीत 
व फक्त सरकारच्या जाहिराती करीत राहणे हेच फक्त काम  प्रसार माध्यमाचे झालेले आहे ,व ही बाब वृत्त पत्र स्वातंत्र्यासाठी जशी घातक आहे तशीच ती देशाच्या लोकशाही साठी सुद्धा घातक आहे ,हे देशातील नागरिकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे ,
आज प्रसार माध्यमावरील मक्तेदारी ही अंबानी ग्रुप ची आहे व शेकडो चॅनल मधील त्याची भागीदारी ही मोठ्या प्रमाणात असल्याने ,मालक  सांगतील ही भूमिका त्यांना अदा करावी लागत आहे ,
प्रसार माध्यमाचा अलिप्त पणा लोप पावला  असून आपले अस्तित्व व रोजी रोटी साठी ही त्यांना या भांडवलदारी शक्तीवर अवलंबून रहावे लागत आहे हे वास्तव भीषण आहे 
यामुळे सरकारला जे हवे आहे व त्यांची जी व जशी ईच्छा आहे तेच लोकांना दर्शवले जात आहे व वास्तवातील प्रखरता बेमालूम पणे दडवली जात आहे 
दुखणे झाकल्या मुळे भासवले जाणारे निरोगी पण हे वास्तवातील निरोगीपण नसते ,त्यामुळे वास्तविक फसवणूक इतरांची नाही तर रुगणाची होत असते ,व जेंव्हा हा रोग बळावतो तेव्हा सारेच संपलेले किंवा हाता बाहेर गेलेले असते ,,
देश पातळीवर ,या देशाचा घटलेला विकास दर , वाढलेली बेरोजगारी, बंद पडलेले उद्योग , शेती ची दुरावस्था ,
शेतकरी व शेती क्षेत्रातील वाढत्या आत्महत्या , कोरोना रुग्णा च्या वाढत्या संख्या व याचा आवळत चाललेला अजगरी विळखा ,देशा पुढे आक्रमनकारी शत्रू राष्ट्रांनी सीमे वर मांडलेला उच्छाद तर कानपूर सारख्या भागातून नागरी संस्कृतीत वाढलेला अंतर्गत दहशतवाद , गुंडांचा वाढलेला भीषण हैदोस , धार्मिक कडवेपण व जातीय कडवेपणातून निर्माण झालेले भारतीयातील  विघटनकारी शत्रुत्व ,परस्पर विसंवाद ,एक ना अनेक समस्या असताना ही या समस्येवर माध्यमे बोलत नाहीत ,त्यावर विचार मंथन होत नाही ,
शोषकाची मूठ आवळलेली असताना ही शोषित अजून ही तुकड्या तुकड्यात विखुरलेले आहेत ,यांना सांधनारे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व च दिसत नाही ,व ही कमतरता एस सि एसटी व ओबीसी समुदायात आहे ,, या चळवळी कडे ही स्वतंत्र अश्या वृत्तपत्राची कमतरता आहे किंवा कसलेच माध्यम त्यांचे हातात नाही ,
आपल्या बातम्यांचे कव्हरेज राष्ट्रीय पातळीवरील चॅनल करीत नाहीत अशी  खंत ते व्यक्त करतात ,
तर या वर्गातील बुद्धिजीवी नोकर वर्ग आज सुस्तावलेला आहे , त्याला जितके सुरक्षित वाटते आहे तितके सुरक्षित आजचे वातावरण नाही , व वाढत्या खाजगिकरणा मुळे त्यांच्या भावी पिढ्या उध्वस्त होऊन रस्त्यावर आल्या शिवाय राहणार नाहीत ,
शासक वर्ग सातत्याने बहुजन विरोधी कायदे संमत करून घेत आहे , असाच निकाल न्यायालये ही देत आहेत ,आणि माध्यमे मूग गिळून गप्प बसले आहेत ,हे सारे भयावह आहे ,,
ग्रामीण भागातील पत्रकार तर पूर्णतः रस्त्यावर आलेला आहे ,व ह्या वर्गा पुढे जगण्याची साधने ही शिल्लक राहिलेली नाहीत,हे वास्तव  लक्षात घेतले नाही तर आज प्रसार माध्यमे अंता कडे चालली आहेत ,तर पत्रकाराचा अंत निश्चित आहे 
 तूर्त इतकेच,,,,,!
****************


ऍड अविनाश टी काले अकलूज 
ता, माळशिरस
जिल्हा , सोलापूर
संपादक दै महापर्व
9960178213


Previous Post Next Post