Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शिवसेना लातूर माजी जिल्हाप्रमुख नागेश माने यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक* - पालकमंत्री अमित देशमुख

शिवसेना  लातूर माजी जिल्हाप्रमुख नागेश माने यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक

- पालकमंत्री अमित देशमुख

**भावपूर्ण श्रद्धांजलि**



लातूर (प्रतिनिधी) : शिवसेनेचे लातूर माजी जिल्हा प्रमुख ॲड. नागेश माने यांच्या निधनाचे वृत्त  धक्कादायक असून, मित्र पक्षातील सहकारी गमावल्याचे आपणाला दुःख झाले आहे असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे .

पालकमंत्री अमित देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख ॲड. नागेश माने हे तरुण तडफदार आणि सकारात्मक विचारसरणीचे पदाधिकारी होते. विधी क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य होते. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी ते तत्पर असत. त्यांच्या जाण्याने राजकीय-सामाजिक आणि विधी क्षेत्रातही पोकळी निर्माण झाली आहे,

माने कुटुंबियांच्या दुःखात व्यक्तिशः मी आणि देशमुख कुटुंबीय सहभागी आहोत  त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वराने प्रदान करावी  ही प्रार्थना .

ॲड. नागेश माने यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


Previous Post Next Post