जयंतराव चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन
लातूर दि,28,
लातूर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे राजकिय, सामजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व जयंतराव चौधरी यांचे अल्पशा आजाराने 27 जुलाई सोमवारी सायंकाळी निधन झाले त्यांचे मृत्यू समयी वय 62 होते त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी चिंचोली (ब) येथे मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले
दिवंगत जयंतराव चौधरी हे शहरातील परशुराम जयंती,लोकमान्य टिळक समितीचे पदाधिकारी होते अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे रोखठोक बोलनारे हे व्यक्तिमत्व जयंतराव चौधरी यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे
त्यांच्या पस्चात पत्नी,2 मुली,1 मुलगा,जावाई,नातू असा परिवार आहे