Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

विकास दुबे एनकौंटर* *एक राजकिय व्यवस्थेचा बळी*

विकास दुबे एनकौंटर
एक राजकिय व्यवस्थेचा बळी...


उत्तरप्रदेश सरकारची अब्रू चव्हाट्यावर टांगणारी घटना म्हणजे कानपुर मधील पोलिसांचे झालेले एनकौंटर 
ज्यात 8 पोलीस त्यांच्या प्रमुखा समवेत मारले गेले ,
अनेक खुनात व गंभीर गुन्ह्यात सामील असलेला विकास दुबे हा एका रात्रीत घडलेला नाही 
भारतीय राजकारणात राज्यकर्त्यांच्या आश्रयाने गुंड पोसले जातात ,त्या गुंडांची बस उठ दबंग राजकीय नेत्या समवेत असते ,,
त्यास पोलीस स्टेशन द्वारे संरक्षित केले जाते ,व तो गुन्ह्या मागून गुन्हे घडवीत राहतो ,
कायदा व लोकशाही व्यवस्थेतेतील प्रशासकीय ,व सुरक्षात्मक उपाय योजना त्यास खिशात असल्याचा भास होतो ,याचे कारण या व्यवस्था त्याचे बाबतीत खिळखिळ्या झालेल्या असतात 
देशातील कोणतीच न्यायालये त्याला शिक्षा करण्यास असमर्थ ठरतात ,याचे कारण फिर्यादी च फिर्याद देण्यास धजावत नसतात ,व असा एखादा तक्रारदार उत्पन्न झाला तरी त्यास साक्षीदार ही मिळत नाहीत , व साक्षीदार निर्माण झालेच तर त्या साक्षीदारांना जबरी किंमत मोजावी लागते ,कदाचित त्याला आपला जीव ही गमवावा लागतो ,,
बऱ्याच वेळा पोलीस तपास यंत्रणा त्यास अशी सूट देतात की आरोपी सुटतोच पण तपास यंत्रणेवर कोर्टा द्वारे ताशेरे ओढले जातात ,जणू त्यांनी सद्गुरू च्या मानवी हक्काचे उल्लंघन करून त्याचे विरुद्ध कारवाई केली आहे 
हे का घडते?
याचे उत्तर समाजव्यवसथा हेच आहे ,,
राजकीय सत्ता बदलते ,पण हे बदल वरवरचे असतात ,व ह्या सत्तेतील काही घराणी ही कायमस्वरूपी सत्तेवर आरूढ झालेली असतात ,अगदी वंश परंपरेने त्यांना सत्ता मिळत जाते ,लोक ही त्यांनाच ती सत्ता बहाल करतात ,,
भाकरी कधी फिरवलीच जात नाही ,,
या वर्गातील लोकांना आपला रुबाब सर्वसामान्य माणसापेक्षा अधिक मोठा आहे हे दर्शवणे भाग असते ,आणि ते मोठेपण जपणुकीसाठी गाव ते तालुका पातळीवरील गुंडा ची आवश्यकता भासते , हाच वर्ग सामान्य जनतेच्या मनात व उरात धडकी भरवून ठेवतो ,या सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील प्रत्येक आवाज जो न्यायोचित असतो तो ही दाबून टाकण्याचे काम करीत असतो ,
असा विरोधक निर्माण झालाच तर त्यांचे जगण्याचे संपूर्ण मार्ग बंद केले जातात , व या विरोधकाला इतके हतबल केले जाते की शेवटी त्याने ही शरणागती च स्वीकारावी ,,
गाव पातळीवरील एक गठ्ठा मतदान देण्याची क्षमता त्याचे ठायी असते ,
 पण हे सारे फुकट घडत नाही ,त्या साठी पैसा लागतो ,वैध अवैध शस्त्रे लागतात ,व संघटित टोळके ही असावे लागते ,
हया ग्रुपला सांभाळण्या साठी नियमित उत्त्पन्न असावे लागते ,जे त्यांना मिळते ,अवैध धंद्यातून ,दारू ,गांजा ,जुगारी अड्डे ,हे तर असतातच परंतु जस जशी हिंमत वाढेल तसं तसे ,अपहरण ,खंडणी ,हप्ते वसुली हे प्रकार ही चालू होतात ,
वाळू सारखी गौण खनिज संपत्ती शासनाच्या परवानगीशिवाय लुटली जाते ,त्यात यंत्र सामुग्रीचा ही वापर केला जातो ,,व ह्या बदमाश लोकांची संपत्ती दिवसागणिक वाढत जाते 
बुद्धिजीवी व नीतिमान लोक पै पै ला मोताद असतात तर गुंड पुंड नोटा वर लोळत असतात 
ज्ञात उत्पनाचे कायदेशीर स्तोत्र नसताना ही संपत्ती कुठून व कशी आली याचे विवरण त्यांना भारत सरकारचे आयकर विभाग ही विचारत नाही ,,
काळा पैसा काळा पैसा म्हणतात तो असा निर्माण केला जातो ,
भाजपच्या एका राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्याने ,जूदेव यांनी म्हटले होते 
*पैसा भगवान तो नही*
*मगर भगवान से कम भी नही*
हे त्यांचे म्हणणे खरे आहे ,,
*राजकारण हा बदमाश्याचा शेवटचा अड्डा आहे*
अस एक तत्ववेत्ता म्हणाला होता कदाचित ही बात खरी ही असावी असे आता मला ही वाटू लागले आहे ,
सामान्य व नीतिमान राहून पक्षीय वाटचाल करणे व त्यात स्थान निर्माण करणे प्रचंड अवघड आहे ,,
*एके काळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या समवेत मी कार्यरत होतो*
*ते मला म्हणाले होते की सर्व प्रकारच्या संस्थात्मक जाळे असताना ही राजकारणात आमच्या सारख्याना ही संघर्ष करावा लागतो*
*तिथे तुमचे भवितव्य काय?*
हा सल्ला मी मानला नाही आणि त्याची कडवट फळे आजही भोगतो आहे 
असो ,
राजकारणात या प्रकारची शक्ती असल्या मुळेच विकास दुबे निर्माण झाला ,व 60 पेक्षा अधिक नोंदणीकृत गुन्हे त्याने घडवले ,,
आपल्याच प्रिन्सिपॉल ला थंड पणे मारून त्यांचे रक्त हाताला चोळत हा बदमाश बाहेर निघून गेला ,, लोकांना आपल्या घरी बोलावून त्यांना दमदाटी वा मारहाण करणे ही बाब त्याचे साठी किरकोळ होती ,,
बहुजन समाज पार्टी ,
समाजवादी पक्ष ते भाजपा असा त्याचा प्रवास झाला ,सर्व पक्षात त्याची पोहच मोठी होती ,
एक तर दुबे असल्या मुळे सामाजिक मान्यता आपोआप असते ,व त्यात राजकीय संरक्षण म्हणजे मान्यतेत अधिकची वृद्धी ,,
त्यामुळे मर्यादित शक्ती बाळगणारे स्थानिक पोलीस व अधिकारी ही त्यास हवा तो मान सन्मान बहाल करीत होते ,,
तेथे कार्यरत असणाऱ्या स्थानिक दरोगा ने  वरिष्ठ पोलीस अधिकारी छापे मारी करणार असल्याचे व आरपार ची लढाई केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे कळवले मुळेच हे हत्याकांड त्यास प्लॅनिग करून करता आले ,, 
पण योगी सरकारचा चेहरा ही या कृत्याने ओरबाड ला गेला ,,
या नंतर ही हा ग्रुप फरार झाला ,
विकास दुबे चा उजवा हात समजला जाणारा अमर दुबे  फरीदाबाद जवळ मारला गेला ,
तर उत्तर प्रदेश च्या सर्व सीमा बंद असताना ही विकास दुबे  *मध्यप्रदेशात*
पोहचला 
तेथून त्याने *उज्जैन*
शहर गाठले ,व *महाकालेश्वर*
मंदिरात तो पोहचला ,तेथे त्याने मंदिराची देणगी पावती फाडली ,250 रुपयांची ही पावती व त्यावर ,विकास दुबे हे नाव त्याने जाणीव पूर्वक कथन केले ,,
उजैन मधील रस्त्यावर त्याने आरडा ओरडा करीत मी विकास दुबे ,कानपूर  चा या मागे त्याचा तर्क होता की मला पोलीस अटक करतील , व माझा ते एनकौटर करणार नाहीत ,,
पण त्याचा हा तर्क चुकीचा होता ,,
*त्याची जवळीक असणे उघड होणे ही आत्ता अभिमानाची बाब राहिलेली नव्हती*
*तो राज्यकर्त्या साठी घशातील अडकलेली हड्डी बनलेला होता*
*ज्याला ते लपवू शकत नव्हते ,वा गिळू ही शकत नव्हते*
*उलट त्यांचा राजकीय दृष्ट्या जीव घेणारी ती हड्डी बनलेली होती*
*ऑपरेशन करणे आवश्यक होते ते ही*
*कुमारी माता ज्या प्रमाणे एबोर्शन (गर्भपात)गुपचूप पणे करते*
*तसे हे केले गेले*
विकास दुबे ला कानपुर ला घेऊन येताना पोलीस ताफयातील गाडी पलटी झाली व त्या संधीचे सोने करून घेण्यासाठी विकास दुबे पळून जाताना पोलिसांनी त्याचा एनकौटर केला ,
अशी कहाणी समोर येत आहे ,, 
*राज्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने या वर कायमचा पडदा पाडला आहे*
आता सारेच सुरक्षित झालेले आहेत ,
*या एनकौटर द्वारे कायद्याचे लांब असणारे हात त्यांनी आखूड बनवले आहेत*
व हेच भीषण वास्तव आजचे आहे 
राजकारणाचा विकृत चेहरा या निमित्ताने उघड झाला 
आमचे बाप,आमचे दैवत,
आमचा आधार
असल्या उपमा देत राज्यकर्त्या साठी आपल्या शक्तीचा गैर वापर करणाऱ्या त्या तमाम युवकांसाठी हा संदेश आहे  की 
*गरज असेल तो पर्यंत राज्यकर्ते तुमचा वापर करून घेतली ही ,पण अडचणी चे ठराल त्याक्षणी तुमचा एनकौउटर ही ठरलेला आहे,
तूर्त इतकेच,,,,,!
****************


ऍड अविनाश टी काले अकलूज 
ता, माळशिरस
जिल्हा , सोलापूर
संपादक दै महापर्व
9960178213


 


Previous Post Next Post