Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

निष्क्रियता, हलगर्जीपणा आणि कर्तव्य न पेलवणारे सरपंचास बडतर्फ करून ग्रामपंचायत बरखास्त करा

निष्क्रियता, हलगर्जीपणा आणि कर्तव्य न पेलवणारे सरपंचास बडतर्फ करून ग्रामपंचायत बरखास्त करा 


व्यंकटराव पनाळे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मा


 


लातुर : दि. १७ - लातूर तालुक्यातील महानगरपालिकेच्या लगत असलेली मोठी ग्रामपंचायत निष्क्रिय, हलगर्जी, आणि कर्तव्य न पेलवणारे व्यक्तीच्या हातात असल्यामुळे हरंगुळ बु. ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावामध्ये सर्व नाल्या घाणीने गच्च भरले असून रस्त्यावरही घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नाल्यांची साफसफाई नसल्यामुळे नुकत्याच झालेल्या पावसात पावसाचे वाहणारे पाणी या गटारी मधून वाहु शकले नाही.  त्याचा परिणाम गटारीचे घाण पाणी लोकांच्या घरात घुसले आणि हे घाण पाणी रस्त्यावरुन वाहू लागले, त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. गावापासुन अंतरावर ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या राजेनगर, विठ्ठलनगर, कैलासनगर, या भागातील नागरिकांना आपल्या घरापर्यंत जाण्यासाठी नीट रस्तेसुद्धा  ग्रामपंचायत करू शकली नाही. थोडा जरी पाऊस झाला तरी लोकांना आपली वाहने अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर सोडून  पादत्राणे हातात घेऊन घराकडे यावे लागते. अनेक नगरांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. गावाच्या विकासालाच पूर्णतः खिळ बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जनतेच्या आवश्यक गरजा भागवण्यास कसूरपणा केल्यामुळे सरपंच निष्क्रिय व असमर्थ ठरले आहेत. कोरोना महामारीच्या कालावधी मध्ये सरपंच पूर्णतः अपयशी ठरले असुन ग्रामपंचायत मार्फत गावातल्या गोरगरीब कुटुंबांना साधे मास्क व सँनिटायझर्स सुद्धा वाटप केलेले नाही. वयोवृद्धांच्या आरोग्याची तपासणी करण्याची नितांत गरज असताना ग्रामपंचायत मार्फत हेही करू शकले नाहीत. कोरोना महामारी बाबतित जनतेचे प्रबोधनही साधे करण्यात आलेले नाही. नेहमी करावी लागणारी जंतुनाशक फवारणी पण  नियमितपणे ग्रामपंचायतीने केलेली नाही. याचाच परिणाम म्हणून हरंगुळ बु. ग्रामपंचायत क्षेत्रातील मंदार विभागात कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. ग्रामपंचायतीचे असेच दुर्लक्ष राहिल्यास हरंगुळ हे कोरोना नगरी होण्यास वेळ लागणार नाही. असे व्यंकटराव पनाळे यांनी म्हटले आहे.
हरंगुळ बु. ग्रामपंचायत हद्दीत राजरोसपणे गुटखा, गोवा, दारूची विक्री केली जाते. तसेच मटका सुद्धा सर्रास खेळला जातो. गावातील अनेक तरुण याच्या आहारी गेलेले दिसून येतात. तरीसुद्धा ग्रामपंचायत याबाबतीत काहीही प्रतिबंधात्मक पाऊले उचलत नाही असे पनाळे यांनी म्हटले आहे. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनावर जनतेत प्रचंड नाराजी दिसून येते आहे.  
जिल्हाधिकारी आणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हरंगुळ बु. ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांची होत असलेली गैरसोय व ग्रामपंचायत कडून जनतेच्या आवश्यक त्या सेवा पुरविण्यात होत असलेली हेळसांड, निष्क्रियता तसेच सरपंच यांचा हलगर्जीपणा व त्यांची सरपंच म्हणून काम करण्यास असलेली अकार्यक्षमता प्रत्यक्ष हरंगुळ येथे भेट देऊन व प्रत्यक्ष पाहणी करून, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आपण तात्काळ सरपंचास बडतर्फ करून किंवा ग्रामपंचायत बरखास्त करून प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. आणि जनतेला योग्य त्या गरजा पुरवून कोरोनाच्या कालावधीमध्ये आधार द्यावा अशी मागणी हरंगुळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्याबरोबरच हरंगुळ बु. चा एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी ग्रामस्थांना असेही आवाहन केले आहे की नेहमीच तर मी आपल्या सर्वांच्या संपर्कात असतोच परंतु सध्या लाँकडावुन मुळे बाहेर फिरण्यावर मर्यादा आले कारणाने सध्याच्या कोरोना कालीन या संकटाच्या परीक्षेच्या कालावधी मध्ये आपल्यापैकी हरंगुळ बु. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोणालाही कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर व्हाँट्सअप, एसएमएस किंवा मोबाईलवर कॉल करून आपली अडचण सांगावी माझ्या परीने सर्वतोपरी मदत करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. असे ग्रामस्थांना व्यंकटराव पनाळे यांनी सांगितले आहे. सर्वजण आपापल्या घरी राहाच राहून सुरक्षित रहावे व विनाकारण घराबाहेर पडू नये. सामाजिक अंतर पाळुन मास्कचा वापर करावा. स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्यावी. आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असेही व्यंकटराव पनाळे यांनी गावकऱ्यांना आव्हान केले आहे.


Previous Post Next Post