Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

"पीएम केअर्स फंड'' एनडीआरएफ ला देण्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखीव

"पीएम केअर्स फंड'' एनडीआरएफ ला देण्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखीव


 नवी दिल्ली-कोरोना महामारी च्या काळात मदत निधी म्हणून पीएम केअर मध्ये जमा झालेला निधी राखीव आपत्ती निवारण कक्षात जमा करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राखीव ठेवला या प्रकरणाची सुनावणी आता पूर्ण झाली आहे पुढील आठवड्यात न्यायालयात अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे.
पीएम केअर्स मधील निधी खाजगी स्वरूपाचा नसून तो मदत कार्यासाठी देण्यात आलेला आहे. त्यामुळे तो एनडीआरएफच्या कोषात जमा करण्याची मागणी याचिकाकर्ते दुयंत दवे यांनी केला आहे. पीएम केअर ची निर्मिती ही आपत्ती व्यवस्थापन कायद्याला  डावलून करण्यात आली आहे, यातील जमा निधीचे महालेखापरीक्षक कडून ऑडिट केली जात नाही, आम्हालातर ते खासगी संस्थांकडून केली जाते असा आरोप त्यांनी  आपल्या याचिकेतून केला आहे. तर पीएम केअर हा एक  स्वैच्छीक कोष  आहे त्यातील निधी हा एनडीआरएफ ला सुपूर्त करून व्यवस्थापन विभागाला दिला जातो असा बचाव  तुषार मेहता यांनी केला आहे. त्याच वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांनी सुद्धा आपले म्हणणे मांडले पीएम केअर्स मध्ये सहकार उद्योग क्षेत्रातील लोक योगदान देऊ शकत नाहीत त्यामुळे हा फंड एनडीआरएफ कडे हस्तांतरित करण्यास काहीच हरकत नाही यात सरकारने लपाछपी करू नये असे सिब्बल म्हणाले सर्वांचा युक्तिवाद एकूण घेत न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवला आहे लवकरच न्यायालय आपला फैसला सुनावणार आहे.


सौजन्य- पुन्यनगरी


Previous Post Next Post