संपादक किरण बनसोडे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा "कोरोना योद्धा" पुरस्कार जाहीर
लातूर: शेवटच्या श्वासापर्यंत कर्तव्य करण्याचा व राष्ट्रहिताचा ध्यास,लोककल्याणाची आस, हे ब्रीद घेऊन चालणारे दैनिक सोलापुर लोकवार्ता व लोकवार्ता युट्युब चॅनलचे संपादक किरण बनसोडे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा लातूर यांच्यावतीने कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कोरोना या महामारीच्या काळात ज्या ज्या व्यक्तीने समाज हितासाठी काम केले अशांना कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार द्यावा असे राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,राज्य संघटक संजय भोकरे,राज्य सचिव विश्वास आरोटे, मराठवाडा संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या सूचनेवरून लातूर जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने गौरविण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून लातूर येथील लोकप्रिय दैनिक लोकवार्ता हे एक आहे. सोलापूर येथून प्रकाशित होणारे दैनिक लोकवार्ताचे संपादक किरण बनसोडे यांनी लॉकडाऊनच्या काळात अखंडितपणे वृत्तसेवा देऊन केलेले काम हे गौरवास्पद असून त्यांच्या कामाची दखल घेऊन लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक देडे यांनी किरन बनसोडे यांना पुरस्कार जाहीर केला आहे.
कोरोना महामारीच्या काळात सरकारचे अनेक निर्बंध असताना आपल्या वाचकापर्यंत जनजागृती होण्यासाठी ऑनलाइन नियमित सेवा देऊन आपले दैनिक लोकवार्ता व लोकवार्ता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकहिताचे काम केले. किरण बनसोडे हे बी.ए.,एम. एस.डब्ल्यू., बी.जे. असे उच्च शिक्षीत असून त्यांनी आतापर्यंत दैनिक एकमत, दैनिक सम्राट, दैनिक लोकप्रशासन, दैनिक जनमत, दैनिक पंढरी भूषण, दैनिक सुराज्य, दैनिक तरुण भारत असा सतरा वर्षाचा प्रवास केल्यानंतर आपल्या स्वतःच्या मालकीचे दैनिक लोकवार्ता हे चालू केले आहे. आज हे दैनिक सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पुणे,सांगली येथून एकाच वेळेस प्रकाशित होत आहे. येणाऱ्या काळात हळूहळू महाराष्ट्रभर याच जाळ पसरविले जाईल, असा मानस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आपली पत्रकारिता सुरू केली असे संपादक किरण बनसोडे यांचा आहे.
कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतर या पुरस्काराचे वितरण केले जाईल,असे लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक देडे यांनी जाहीर केले.या बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष रघुनाथ बनसोडे,जिल्हा सचिव अशोक हनवते,जिल्हा संघटक महादेव डोंबे, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण जे. कांबळे,उपाध्यक्ष श्रीधर स्वामी, लिंबराज पन्हाळकर, हरून मोमीन,नितीन भाले प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.