Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

5 ऑगस्ट : 'या' वेळेनुसार पार पडणार राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम

5 ऑगस्ट : 'या' वेळेनुसार पार पडणार राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम*


✍️विष्णु आष्टीकर✍️ 



*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (बुधवार) राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास 3 तास अयोध्या दौऱ्यावर असतील. यामध्ये मंदिराचं दर्शन, पूजा अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.*


 *असा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भूमिपूजनाचा कार्यक्रम-*


*5 ऑगस्ट सकाळी 9.35 वाजता दिल्लीतून प्रस्थान*
*10.35 वाजता लखनौ विमानतळावर लँडिंग*
*10.40 वाजता अयोध्येसाठी हेलिकॉप्टरमधून प्रस्थान*
*11.30 वाजता अयोध्येतील साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर लँडिंग*
*11.40 हनुमानगढी येथे पोहोचून दर्शन आणि पूजा*
*12.00 राम जन्मभूमी परिसरात पोहोचण्याचा कार्यक्रम*   
*12.15 वाजता परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम*
*12.30 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम*
*12.40 राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम*
 *2.05 वाजता साकेत कॉलेजच्या हेलिपॅडसाठी प्रस्थान*
 *2.20 वाजता लखनौसाठी प्रस्थान*


🧧 *श्रीराम मंदिराच्या ट्रस्टकडून एकूण 175 जणांना भूमिपूजनाचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.  त्यापैकी देशातील निरनिराळ्या भागातील संतांचा समावेश आहे. सुरक्षेच्या कारणास्तव देण्यात आलेल्या प्रत्येक निमंत्रण पत्रिकेवर एक कोड छापण्यात आला आहे. सर्व आमंत्रित पाहुणे आज अयोध्येत पोहोचणार आहेत.* 
 
*मंदिर ट्रस्टकडून सर्वप्रथम इक्बाल अन्सारी यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. ते सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशिदीकडून पक्षकार होते. याव्यतिरिक्त सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत विशेष अतिथी म्हणून दाखल होणार आहेत*. 


✍️विष्णु आष्टीकर✍️ 


*


Previous Post Next Post