Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

खाजगी हॉस्पिटलचे बील शासनाने भरावेः बाहेती

खाजगी हॉस्पिटलचे बील शासनाने भरावेः बाहेती 


लातूर, दि.१२- सध्या राज्यात कोरोनाचे थैमान सुरू असून, खाजगी दवाखाने रूग्णाकडून अवाजवी बीले आकारीत आहेत. त्यामुळे नागरिकात रोष वाढत असून कोविड -१९ च्या रूग्णांचे बील शासनाने भरून दिलासा द्यावा अशी मागणी भाजपचे शहर कार्यकारिणी सदस्य अंकित बाहेती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात बाहेती यांनी म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात तसेच लातूर जिल्ह्यात कोरोनाचा ङ्गैलाव वाढत आहे. याचा ङ्गायदा खाजगी रूग्णालय घेत असून त्यांनी मनमानी पद्धतीने कारभार सुरू केला आहे. याकडे शासन व स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असून खाजगी रूग्णालया अव्वाच्या सव्वाचे बिले आकारीत आहेत.

कोरोनाच्या कालावधीत जनतेला रोजगार नसल्याने व कोणतेच काम नसल्याने जनता आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. अशातच खाजगी रूग्णालयांनी कोरोना रूग्णांची आर्थिक पिळवणूक केल्याने जनता त्रस्त झाली आहे. त्यामूळे शासनाने याकडे लक्ष देवून कठोर निर्णय घेवून रूग्णांची आर्थिक पिळवणूक थांबवावी तसेच खाजगी रूग्णालयाचे बील भरून रूग्णांना दिलासा द्यावा अशीही मागणी अंकित बाहेती यांनी निवेदनात केली आहे.

या निवेदनाच्या प्रती विरोधी पक्षनेते देवेंद्र ङ्गडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिकेचे आयुक्त यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.


Previous Post Next Post