Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पदाचा गैर वापर करणार्या लातूर शहर डी वाय एस पी सचिन सांगळे यांना निलंबित करा! भीम आर्मी भारत एकता मिशन लातूर च्या वतीने पोलीस अधीक्षक याना निवेदन

पदाचा गैर वापर करणार्या लातूर शहर डी वाय एस पी सचिन सांगळे यांना निलंबित करा!


भीम आर्मी भारत एकता मिशन लातूर च्या वतीने  पोलीस अधीक्षक याना निवेदन  



लातूर प्रतिनिधी:--------
            सदरील डी वाय एस पी लोकशाही हक्काचे पायमल्ली करून सुलतानी कारभार करत आहेत.विविध राजकिय,( सामाजिक ) पञकारांना साहेबांकडून मारहाण व शिवीगाळ तसेच अपमानजनक वागणुक मिळत आहे‌.समोरील प्रकरण म्हणजे रघुनाथ बनसोडे,नरसिंग घोणे,दिपरत्न निलंगेकर,विष्णू आष्टेकर,सनि बनसोडे,
          वरिल नामांकित लोकांना डी वाय एस पी  साहेबांनी सार्वजनिक ठिकाणी मारहाण ( हरासमेंट ) केलेली आहे.सामान्य जनतेला तर (पी सी आर) नसताना त्यांच्या पायाची नळी,बोटे, फुटेपर्यंत मारहाण करत आहेत.व शहरांमध्ये दहशतीचे वातावरण करत आहेत.तरी मा.साहेबांनी ( पोलीस अधीक्षक ) डी वाय एस पी यांना लोकशाहीची चौकट समजेपर्यंत तात्काळ निलंबित करावे.अन्यथा आम्हाला आमची भुमीका घ्यावी लागेल. असे निवेदनात
भिम आर्मी भारत एकता मिशन च्या कार्यकर्त्यांनी इशारा ही दिला आहे
यावेळी निवेदनावर आदीच्या स्वाक्षरी आहेत
महाराष्ट्र प्रदेश संघटक :- अक्षय धावारे
लातूर जिल्हा प्रमुख :- विलास चक्रे
जिल्हा उपाध्यक्ष :- आनंद पडसाळे
शहर अध्यक्ष :- बाबा ढगे
शहर सचिव  :- बबलू गवळे


Previous Post Next Post