आण्णा भाऊं साठे जयंती दिवशींअभिवादनास मज्जाव करणाऱ्या अधिकाऱ्याच्या बडतर्फीसाठी सोमवार दि.17 रोजी आंदोलन
लातूर-आण्णा भाऊंच्या जयंतीदिनी त्यांच्या पुतळ्याच्या अभिवादनास मज्जाव करत दहशत माजवणारे व मा.नगरसेवक तथा जेष्ठ पत्रकार रघुनाथ बनसोडे यांचा अवमान करणारे, लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी, सचिन सांगळे यांना बडतर्फ करण्यासाठी उद्या दि.17 ऑगस्ट 2020 रोजी स.11:00 वा. गन्जगोलाई लातूर येथील आण्णा भाऊंच्या पुतळ्यासमोर "पोलीस-दडपशाही विरोधी जनआंदोलन" च्या माध्यमातून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आण्णा भाऊंच्या पुतळ्यास सन्मानपूर्वक अभिवादन करून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन, "पोलीस-दडपशाही विरोधी जनआंदोलन"ची घटक असलेल्या रिपब्लिकन सेनेसह, शेकाप, संभाजी ब्रिगेड, आप, बसपा, डी.पी.आय., स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद, मराठा लिबरेशन टायगर्स, भीम आर्मी, महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघ, सत्यशोधक समाज महासंघ, मानवी हक्क अभियान, दलित महासंघ, लसाकम, असाकम, पँथर संघर्ष, महाराष्ट्र युवा शक्ती, ब्लू पँथर्स, वन्दे मातरम संघटन, लहूजी शक्ती, मातंग सेना, लहू सेना, महाराष्ट्र युवा संघटना, शामभाऊ ग्रुप, दलित विकास आघाडी, त्याचप्रमाणे आण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समीती लातूर व इतर पुरोगामी पक्ष-संघटना तथा पत्रकार संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.