Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

चाकूरचा तरुण कोरोना योद्धा योग प्रशिक्षक ओंकार गादगे देत आहे कोरोना रुग्णांना योगाचे धडे!!!!

चाकूरचा तरुण कोरोना योद्धा योग प्रशिक्षक ओंकार गादगे
देत आहे कोरोना रुग्णांना योगाचे धडे!!!!



लातूर-कोविड रुग्णांवर योग्य उपचार आणि या विषाणूपासून बचावासाठी राज्य सरकार तथा जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुकास्तरावर कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रावर आरोग्य अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करून कोरोना योध्यांची भूमिका पार पाडत आहेत. जिल्ह्यातील चाकूरच्या कोविड केंद्रात चाकूरचाच एक तरुण कोविड योद्धा म्हणून समोर आला आणि प्रत्यक्ष कोविड रुग्णांना योगाचे प्रशिक्षण देऊ लागला.


ओरिसा राज्यातील कटक येथील श्री श्री विश्वविद्यालयातून योगा पदवीधर झालेला ओंकार गादगे लॉकडाऊन मुळे चाकूरला आपल्या घरी परतला. जिल्हाभरात रुग्णांची वाढत चाललेली संख्या लक्षात घेता प्रशासनाने चाकूरला कोविड केअर सेंटर सुरू केले. वैद्यकीय उपचारासोबतच अशा रुग्णांना मानसिक आधार, त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास योगाची मदत होईल अशी संकल्पना ओंकार यांनी चाकूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ दीपक लांडे यांच्याकडे मांडली या नाविन्यपूर्ण संकल्पनेला योग्य प्रतिसाद देत तहसीलदार डॉ शिवानंद बिडवे यांनी ओंकारला कोविड केंद्रात योगा प्रशिक्षण देण्यास परवानगी दिली. गेल्या 5 जूनपासून सुरू झालेल्या या शिबिराचा लाभ अनेक रुग्ण यांच्यासोबतच तेथील कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांनाही झाला. कसल्याही आर्थिक लाभाची, अथवा मानधनाची अपेक्षा न करता अगदी निस्वार्थ भावनेने सामाजिक बांधिलकी म्हणून रुग्णांची सेवा करणारा ओंकार याचे कार्य कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहे. अशी अनेक ज्ञात अज्ञात कोविड योद्धे या काळात आपली जबाबदारी पार पाडत आहेत. ओंकारच्या कार्याची दखल घेत तहसीलदार डॉ शिवानंद बिडवे आणि डॉ दीपक लांडे यांनी प्रमाणपत्र देऊन सत्कार केला आहे.
शासनाने अशा निस्वार्थ भावनेने सेवा देणाऱ्या योध्यांची योग्य दखल घ्यावी हीच अपेक्षा.


सतीश तांदळे
पत्रकार
लातूर


Previous Post Next Post