सामान्य नागरिकांना कडक लाॅकडावून..!
अन्अवैध दारू, गुटखा विक्री करणार्यांना खुलेआम सूट!
व्वा..प्या दारू अन् पाळा सोशल डिस्टन्स..!
लातूर-माननीय जिल्हाधिकारी साहेब काय चालू आहे लातूर मध्ये..?मागील तीन महिने नागरिक लाॅकडावून मध्ये बंद आहेत.त्यांना थोडी सूट देऊन दिलासा देण्याचे सोडून दारुसाठी परवानगी देता!..हे म्हणजे आता आती झाले.आपल्याला कोणी बोलणार नाही याचा अर्थ असा नाही की, आपण आपल्या अधिकाराचा असा वापर करणार का?.. असा गंभीर प्रश्न लातूरकर करत आहेत,सर्वसामान्य लातूरकर घरी बसून आहेत,ते काही महत्वाच्या कामा साठी बाहेर आल्यावर पोलिसांच्या लाठ्या खात आहेत,मात्र अवैध धंदे करणाऱ्याचे मात्र, पोलिस प्रशाशन आणि किंबहुना आता आपणही चोचले पुरवत आहात, असे चित्र आता स्पष्ट होताना दिसत आहे. पोलीस प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी स्वत: सिंघम असल्यासारखे वागत आहेत,त्यांना पत्रकार दिसतो ना सामान्य नागरिक कारवाईच्या धमक्या देत दंड वसूल करत फिरत आहेत.मागिल आठ दिवसात बर्याच पत्रकारावर अधिकार्यांकडून उध्धट वागणूक मिळाल्याच्या तक्रारी झाल्या आहेत.अशा अधिकार्यांना निलंबित करावे अशी मागणीही करण्यात आली आहे. यावर अंकुश लावणारे कोणी आहे का?असे लातूरकरांना आणि पत्रकारांना वेठीस धरून लूट करणार का?असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे. आपण दारूची दुकाने विक्रीसाठी परवानगी देऊन नेमके काय साध्य करणार आहेत? गरजेच्या वस्तू वर आपण निर्बंध घालून कोरोना सारखा विषाणू थांबवण्याचा प्रयत्न करत आहात.मात्र असे अवैध दारू, गुटखा खुलेआम विक्री करणाऱ्याला केंव्हा चाप बसवणार?असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जावू लागला आहे.शेवटी आदेश आहे!पाळलाच पाहिजे!
व्वा..!प्या दारू आणि पाळा सोशल डिस्टन्स