कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्याकडून धाडसी कार्यवाही.
तक्रार दाखल होताच अवघ्या दोन तासांत आवळल्या आरोपींच्या मुसक्या.
सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: सोनपेठ तालुक्यात गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत असणाऱ्या सोनपेठ पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पुन्हा एकदा सोनपेठ पोलीसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून गुन्ह्यातील तब्बल 2 लाख 70 हजाराची रक्कम जप्त केली आहे.
मागील दोन वर्षापासून पोलीस निरीक्षक भातलवंडे यांच्या कार्यकाळात सोनपेठमध्ये शांतता राखण्याचे काम सोनपेठ पोलीसांनी केले आहे. यासोबतच जातीय सलोख्यातुन बंधुत्वता मिरवण्याचे धडेही भातलवंडे यांनी स्व:त समाजाला दिले आहेत. दरम्यान रविवार २३ ऑगस्ट रोजी तालुक्यातील डोबाडी तांडा येथे आरोपी रघुनाथ विकास शिंदे रा.सखाराम तांडा,अभिमान आवडू शिंदे रा.डोबाडी तांडा या दोघांनी हिंगोली येथील आकाश रतनलाल कुरील यांना कमी पैशात जास्त सोने देतो, म्हणून बोलावून घेऊन त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले आणि त्यांनाच मारहाण केली.
गंभीर दुःखापत झालेल्या कुरील यांनी सोनपेठ पोलीस स्थानक गाठून घटनेची तक्रार दिली. यानंतर अवघ्या दोन तासात आरोपींकडून दोन लाख सत्तर हजार रूपये हस्तगत करून आरोपींना अटक करत पोलीसांनी ही धाडसी कार्यवाही केली. सदर प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे,हेडकॉन्स्टेबल शंकर राठोड,कॉन्स्टेबल महेश कवठाळे,कॉन्स्टेबल आनंद कांबळे यांनी आरोपींना अटक करत त्यांच्यावर भा.दं.वि.नुसार कलम 394,34 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून. या कार्यवाहीमुळे सोनपेठ पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.