Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

राजकारणात व समाजकारणात डोळे झाकून कुणावर ही अंधविश्वास दाखवू नका

राजकारणात व समाजकारणात डोळे झाकून कुणावर ही अंधविश्वास दाखवू नका 


राजकारण हे बदमाश माणसाचे शेवटचे स्थान आहे असं एक विचारवंत म्हणाला होता*
*राजकारणातील तो लालबहादूर शास्त्री जी सारख्या निरपेक्ष माणसाचा काळ आता राहिलेला नाही*
*जिथे धर्म तत्वज्ञान सांगणारे महाराज हे भोग आणि विलासामध्ये दंग होऊन जेल मध्ये सडत आहेत*
*तिथे राजकारण आणि समाजकारणाचा बुरखा पांघरून समाजाला लुटणारी माणसे अस्तित्वात नसतील च याची काहीही खात्री देता येत नाही*
*थोडीशी गुंडगिरी आणि जमाव जमवण्याची खुबी असली की राजकारणाचा तडका मारून त्याला अधिक आकर्षक बनवता येते*
*अश्या वृत्तीतून काही लोक समाजाला गुलाबी विकासाची स्वप्ने नुसती दर्शवत नाहीत तर ती आकर्षक वेष्टनात पॅक करून समाजाच्या पुढ्यात ठेवतात*
*बाजारात अनेक चैन मार्केटींग चे हेच तत्व असते*
*या मार्केटिंग चे फायदे घेणारे दलाल त्या योजनेचे वारेमाप कौतुक आणि फायदे समाजापुढे मांडत असतात*
*ज्यांना या गुंतवणुकीतील धोके माहीत नसतात ते लाभाच्या आशेने स्वतः ची गुंतवणूक तर करतात च परंतु इतरांनाही भुरळ पाडून गुंतवणूक करण्यास भाग पाडतात*आमच्या विभागात समर्थ मिल्क बॉड पासून ते पर्ल्स व समृद्धी पर्यतच्या योजनांनी हेच केले*
*डी मार्ट सारख्या योजना आणल्या गेल्या*
या सारख्या अनेक संस्था ची नावे सांगता येतील 
*महाराष्ट्रात गाजलेला कडकनाथ कोंबडी पालन घोटाळा हा या पैकी एक*
*या संस्था वर आर्थिक गुन्हे शाखे द्वारे केसेस दाखल होतात*
*याचे कारण आपण गुंतवलेल्या रकमेवर व्याज ही मिळाले नाही किंवा मुदतीनंतर ठरलेली रक्कम मिळाली नाही की आपण फसवले गेलो याची जाणीव व्यक्तीला होते व ते केसेस दाखल करतात*
*राजकारण हे या मानाने थोडेसे सुलभ असते*इथे आर्थिक फसवणूक केली जाणार आहे हेच त्याला ज्ञात नसते*
*प्रचलित अर्थव्यवस्थेतील दोष आपल्या विशिष्ट समुदाया पुढे मांडून हे बद्दलवण्या साठी आपण उद्योग धंदे वा कारखाने विकसित करू असे सांगितले जाते*
*समाजामध्ये आर्थिक परिवर्तन यावे या प्रामाणिक भावनेतून सामान्य माणसे प्रेरित होतात आणि आपली जमीन जायदाद गहाण टाकून त्यावर कर्ज उचलून त्या प्रोजेक्ट साठी देऊ करतात*
*■हे उद्योग त्यांना अनुभव नसल्याने किंवा योग्य ते आर्थिक व्यवस्थापन नसल्याने बंद पडतात*व त्या सामान्य माणसाचा कांही ही दोष नसताना  त्याचे आर्थिक विकासाचे चक्र गोठवले जाते*
*सदर कर्ज थकीत केले गेल्या मुळे सामान्य माणूस हा च थकबाकीदार म्हणून गणला जातो व त्यास कर्ज मिळणे ही दुरापास्त होते*
*या साऱ्या परिस्थिती चा फरक त्या नेतृत्वाला काडी इतका ही पडत नाही*
*याचे कारण संस्था किंवा कारखाना उभारणी करताना जे मशिनरी चे कमिशन प्राप्त होते यातूनच काही कोटी रुपये मलिदा त्यांना व्यक्तिगत मिळून जातो*
*जे निर्माण करण्यासाठी त्यांनी व्यक्तिगत पातळीवर कोणतेही कष्ट उचलले ले नसतात*
*किंवा ते उत्त्पन्न त्यांनी त्यांच्या पारंपारिक व्यवसायातुन  निर्माण केलेले नसते*
*■हाताशी आलेल्या मोकाट उत्त्पनातून ते अधिक उत्पन्न देणाऱ्या पर्यायी व्यवसायात गुंतवणूक करतात*
*लिटीगेशन मधील जमिनी स्वस्तात घेऊन त्याचे प्लॉटिंग करणे*याच जमीन गहाण टाकून त्यावर बँकांची कर्ज उचलणे असे प्रकार चालू राहतात*
*अश्या जागा घेणारे  खरेदीदार नंतर मात्र कायदेशीर दृष्ट्या अडकून पडतात*त्यांनी न घेतलेल्या कर्जाच्या बोजाचे शिक्के त्यांच्या मालमत्ता उताऱ्यावर येऊन बसतात*
*आपली फसवणूक झाली म्हणून ते लोक खेटे मारतात ही परंतु त्यांचा आवाज क्षीण असतो कारण तो पर्यंत हे नेते बनलेले असतात*
*असे नेते राज्य आणि केंद्रातील मोठ्या राजकीय नेत्यांना पकडतात*व आपला आधार म्हणून पक्षीय राजकारण करत राहतात*
*त्या नेत्यांच्या भेटी घेऊन आल्या नंतर खऱ्या खोट्या बातम्या मीठ मसाला लावून समाजव्यवस्थेत पेरत राहतात*
*यातून आपणच कसे तेथील दबंग नेते आहोत*
*■हे दर्शवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो*■
*आपल्या शिवाय दुसऱ्याला आमदारकी मिळणारच नाही*
*मी आमदार होणारच अश्या ही वावड्या उठवल्या जातात*
*आपले राजकीय प्रस्थ आहे तसे टिकावे , व आपले आर्थिक गणित बिघडू नये म्हणून ते आपला वास्तवातील कर्जबाजारी पणा समाजापासून लपवून ठेवतात*
*व सामान्य माणसा पुढे हजारो कोटीच्या गप्पा मारत बसतात*
*राजकारणाचा आस फक्त मीच आहे व हे चक्र फक्त माझ्या भोवतीच फिरत आहे असा दिखाऊ पणा ते करत राहतात*
*याचे कारण त्यांना फसवण्या साठी नवं नवीन शिकार सातत्याने हवी असते व ते कायम त्याचेच शोधात असतात*
*देश वा राज्य पातळीवरील प्रमुख पक्ष नेतृत्वे त्यांचे शिवाय पाणी ही पित नाहीत असा यांचा अविर्भाव असतो*
*■जनतेने या बाबत अधिक सतर्क असण्याची गरज आहे असे मला वाटते*
*बिनबुडाच्या समाजमाध्यमावरून पेरलेल्या बातम्या पाहून कोणीही आपली वा समाजाची फसवणूक करवून घेऊ नये हाच शहाणपणाचा मार्ग आहे*
*थोडेसे सावध व्हा राजकारणाकडे अभ्यासाने पहा तुमची फसवणूक टळेल*■
*तूर्त इतकेच,,,,!*
****************
ऍड अविनाश टी काले अकलूज
 ता:-माळशिरस
जिल्हा :- सोलापूर


Previous Post Next Post