लातूर जिल्ह्यात पत्रकारांना, सामान्य नागरिकांना अमानुष मारहाण झाल्याच्या घटना निषेधार्ह आहेत
अधिकारांचा गैरवापर करणार्यांवर कारवाई व्हावी!- आ. अभिमन्यु पवार
लातूर--
लॉकडाऊन दरम्यान रूग्णालयात दाखल असलेल्या कोरोना बाधित आईसाठी जेवणाचा डबा घेऊन जाणारे पत्रकार श्री अमित सोमवंशी यांना पीव्हीआर चौकात झालेली मारहाण, औराद चे पत्रकार यांना मागे झालेली मारहाण, रक्षाबंधन दिवशी काही सर्वसामान्यांना झालेली मारहाण; अशा सर्व घटना निषेधार्ह आहेत. आजच लातूरचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व पोलिस उपअधीक्षक यांच्याशी या संदर्भात माझे बोलणे झाले असून सदरील घटनांची चौकशी करून अधिकारांचा गैरवापर करणार्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणांमध्ये योग्य ती कारवाई न झाल्यास आगामी अधिवेशनात या विषयांवर तसेच तत्कालीन मुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंजूर केलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीत सपशेल अपयशी ठरलेल्या सरकार विरोधात आवाज उठवणार आहे.
श्री अमित सोमवंशी यांच्यावर उपचार करणार्या डाक्टरांशीही माझे बोलणे झाले असून उजव्या हाताच्या मनगटाला मुका मार लागला आहे, आवश्यक उपचार करण्यात आले आहेत.