Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवर तातडीने कार्यवाही* निवृत्तीवेतनधारक आणि शासकीय योजना लाभधारकांना राष्ट्रीयकृत बँका घरपोच सेवा देणार

पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवर तातडीने कार्यवाही


पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवर तातडीने कार्यवाही 


लातूर (प्रतिनिधी): कोविड१९ प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊन काळात पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार निवृत्तीवेतनधारक आणि संजय गांधी व इतर शासकीय योजनेतील लाभधारकांना घरपोच सेवा देण्याचे राष्ट्रीयकृत बँकांनी मान्य केले असून त्यासाठी त्यांच्याकडून शहराच्या निरनिराळ्या भागात विविध संस्थांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे.


लॉकडाऊन काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे,  स्वतःचे वाहन घेऊनही घराबाहेर पडता येत नाही, बँकेत जाऊन पैसे काढता येत नाहीत. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार निवृत्तीवेतन धारकांच्या वतीने पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे करण्यात आली होती.निवृत्तीवेतन धारकांच्या या तक्रारींची तातडीने दखल घेऊन पालक मंत्री देशमुख यांनी महापौर विक्रांत गोजमगुंडे व आयुक्त टेकाळे यांच्याशी संपर्क करून हे गैरसोय दूर करण्याच्या सूचना केल्या होत्या. सोमवारी महापौर आणि आयुक्त यांनी या संदर्भाने राष्ट्रीयकृत बँक अधिकार्‍यांशी संपर्क करून त्यांची बैठक घेतली. या बैठकीदरम्यान निवृत्तीवेतनधारक तसेच शासकीय योजनेतील लाभधारकांना घरपोच सेवा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी संबंधित बँकाकडून शहराच्या निरनिराळ्या भागात विविध संस्थामार्फत संपर्क प्रतिनिधी नेमले असून त्यांचा संपर्क पत्ता आणि फोन नंबर जाहीर करण्यात आले आहेत. लाभधारकांनी या प्रतिनिधींना संपर्क केल्यास त्यांना हवी ती रक्कम घरपोच मिळणार आहे.
बँक ऑफ बडोदा च्या वतीने राकेश के लातूर 95 35 27 50 68 हे नोडल अधिकारी राहणार असून प्रशांत श्रीधर भाटगावे (जुना औसा रोड) 8605596459, शुभम शैलेश राऊत (चंद्रनगर) 9404720027, राजेंद्र बालाजी देबडवार (बार्शी रोड) 9096327240, निलेश निवृत्ती पोलकेवार (शिवनगर) 9423346604 , पिराजी मोहन सुर्यवंशी (म्हाडा कॉलनी) 9767787624, मनोज भानुदास काळे (विवेकानंद चौ 9766911292 हे संपर्क प्रतिनिधी असतील 
स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वतीने किशोर वाहने 8237779901 हे नोडल अधिकारी राहणार असून श्रीकृष्ण गजानन कुलकर्णी (आदर्श कॉलनी) 8788401067 ऋषिकेश दीपक पांडे ( औसा रोड) 9970849503  अमोल रमाकांत जोशी (आदर्श कॉलनी) 9421195123, विद्या विक्रांत तोडकर (आंबेजोगाई रोड) 9860208660 नितीन प्रल्हाद कांबळे (आर्वी ) 8381072810 हे संपर्क प्रतिनिधी राहणार आहेत.  बँक ऑफ महाराष्ट्र च्या वतीने सुनील जेजुरकर 9970729940 हे नोडल ऑफिसर राहणार असून अमर पिंपरे 8329733321,  दिलीप हांडे 9503110101,  सुरेश गवळी 9860131342, केशव भांगिरे 9021426926 सर्व लातूर संपर्क प्रतिनिधी राहणार आहेत. यांच्या फोन नंबरवर निवृत्तीवेतनधारक आणि शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांनी फोन केल्यास त्यांना हवी असलेली रक्कम घरपोच मिळणार आहे.


 


Previous Post Next Post