Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

BSNL आणखी २० हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ!,याआधी ३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले

BSNL आणखी २० हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ! 


याआधी ३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले 



करोना विषाणूमुळे जगभरात मंदीचे वातावरण आहे. भारतातही गेल्या काही दिवसांपासून अनेकांना आपली नोकरी गमावावी लागली आहे. आर्थिक संकटात अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात आणि कामगार कपात केली आहे. त्यातच आता टेलिकॉम क्षेत्रातील सरकारी कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) २० हजार कंत्राटी कामगारांना नारळ देणार असल्याचे वृत्त आहे. बीएसएनएल कंपनीच्या कर्मचारी संघटनेनं याबाबतची माहिती दिली आहे. बीएसएनएलने याआधीच ३० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा निर्णय अशा वेळी घेतला गेला आहे जेव्हा या कर्मचाऱ्यांना गेल्या एक वर्षाहून अधिक काळ वेतन दिले गेले नाही.
बीएसएनएलल कर्मचारी संघटनेने कंपनीचे अध्यक्ष वी के पुरवार यांना एक पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी कंपनीची हालत खूपच नाजूक असल्याचं सांगितलं आहे. शिवाय, ल्या १४ महिन्यापासून पगार दिला नाही. यामुळे १३ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. VRS योजना अंमलात आल्यानंतर देखील कर्मचाऱ्यांना नियमीत वेळेत पगार दिला जात नाही. असेही सांगितलेय.
बीएसएनएल कंपनीच्या एचआरने एक सप्टेंबरला सर्व मुख्य व्यवस्थापकांना खर्चात कपात करण्याचे आदेश दिले. यात कंत्राटी कर्मचारी कमी करण्यास सांगितले होते. त्याच बरोबर सुरक्षा आणि सफाई कर्मचारी ठेवण्याची गरज नसल्याचेही म्हटले होते. बीएसएनएल कर्मचारी संघटनेचे महासचिव पी अभिमन्यू यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनीनं ३० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं आहे. आता नवीन आदेशानुसार २० हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात येणार आहे.


Previous Post Next Post