सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 21मध्ये अमृत योजनेच्या 187 कोटी निधीमधून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले.
सोलापुर प्रतिनिधी/ ईमाम जमादार
सोलापूर स्मार्ट सिटी योजनेतून सदर काम पूर्ण होत असून आज भूमिपूजन करून कामाचा शुभारंभ करण्यात आला.*
*प्रभाग क्रमांक 21 मध्ये कोरोना संकटामुळे हे काम रखडले होते. कार्यमहर्षी नगरसेवक तौफिक भाई शेख पैलवान यांच्या पुढाकाराने आज कामाचा शुभारंभ झाला.*
*या कामामुळे प्रभागातील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थितरीत्या होणार असून प्रभागातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.*
*हे काम चांगल्यारीतीने पूर्ण व्हावे आणि नागरिकांच्या समस्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा नगरसेवकांनी कंत्राटदारासमोर व्यक्त केल्या.*
*याप्रसंगी कार्यमहर्षी नगरसेवक तौफिक भाई शेख पैलवान, तस्लिम शेख, वाहिदाबी शेख, अझहर हुंडेकरी,मोहमदिया मस्जीदचे ट्रस्टी हाफिज साब असिफराजे शेख, हफी साहब, अमितकुमार अजनाळकर, इरफान शेख, तावेश मोहोळकर, फैज इनामदार, जावेद वास्तव, तौसिफ कुमासगी,Adv वसिम शेख नुरअहमद पठाण चाचा आणि प्रभागातील सर्व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते