स्वर्गीय त्रिंबक आन्ना पाटील भिगोलीकर यांच्या तैल चित्राचे अनावरण
शिरूर आनंतपाळ:(प्रतिनिधी) स्वर्गीय त्रिंबक आन्ना पाटील भिंगोली कर यांचे नेतृत्व संयमी शांत व सर्जनशील होते.शिवनेरी महाविद्यालयाच्या विकासामध्ये त्यांचे फार मोठे योगदान असून हे योगदान आम्ही कधीही विसरू शकणार नाही त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन भविष्यकाळात शिवनेरी महाविद्यालय अशीच प्रगती करेल असे प्रतिपादन शिवनेरी महाविद्यालयाचे अध्यक्ष विशवभर माने रावजी माने यांनी स्वर्गीय त्रिंबक आन्ना पाटील भिगोलीकर यांच्या तैल चित्र अनावरण प्रसंगी व्यक्त केले शिवनेरी महाविद्यालय इसवी सन 2000 मध्ये स्थापना झाली त्या काळापासून विविध क्षेत्रांमध्ये महाविद्यालयाने आपला नावलौकिक केला त्यामध्ये त्र्यंबक अण्णा पाटील यांचा सिंहाचा वाटा असून गेल्या 1 महिन्यापूर्वी अल्पशा आजाराने यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या विचारांच्या आठवण व संस्थेमध्ये असलेले त्यांचे योगदान याची सदैव महाविद्यालय व प्रशासनाला आठवण राहावी यानिमित्ताने त्यांच्या फोटोचे अनावरण शिवनेरी महाविद्यालय येथे करण्यात आले त्याप्रसंगी एडवोकेट विश्वभरराव माने बोलताना पुढे म्हणाले की एक सर्जनशील व्यक्तिमत्व म्हणून त्रिंबक आन्ना यांची आठवण सदैव आमच्या स्मरणात राहील याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट विशंभराव माने स सचिव पद्माकर मोगरगे प्राचार्य डॉक्टर ओम प्रकाश जाधव सर स्टाफ सेक्रेटरी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत पाटील उपप्राचार्य डॉक्टर सूर्यवंशी सर बाळासाहेब पाटील व सर्व स्टाफ मेंबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.