MHT-CET परिक्षेबाबत आ. प्रणिती शिंदे यांची मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याशी चर्चा, अधिक माहितीसाठी www. mahacet.org या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन आ. प्रणिती शिंदे यांनी केले आहे
सोलापुर प्रतिनिधी/ईमाम जमादार
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरप्रवण परिस्थिती निर्माण झालेली आहे व सद्यपरिस्थितीत MHT CET-2020 परीक्षा चालू आहे. त्यामुळे साहजिकच काही परीक्षार्थी यांना मुळ निवासास्थानापासुन परीक्षा केंद्रावर जाण्याकरीता अड़चण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मा. मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार अशी अडचण ज्या परिक्षार्थीस निर्माण झालेली आहे. त्यांनी आपल्या प्रवेशपत्राची प्रत व त्यास अड़चण सविस्तरपणे आयुक्त CET सेल यांना maharastra.cetcell@gmail. com या ई-मेल आयडीवर ज्या दिवशी अडचण आली त्याच दिवशी यांना कळविण्यात यावे. त्याचप्रमाणे आयुक्त CET सेल जे निर्देश देतील त्याचप्रमाणे उचित कार्यवाही करण्यात येईल. अधिक माहिती व सूचनासाठी www. mahacet.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यानी केले आहे