लातूर महामार्ग पोलिसांचा स्तुत्य उपक्रम!! ट्रकचालक आणि त्यांच्या किन्नर ला केले सॅनिटायझर व मास्क चे वाटप
लातूर प्रतिनिधि/लक्ष्मण आळणे
लातूर - महामार्ग पोलिसांच्या वतीने शहरातील औसा रोड परिसरात असणाऱ्या ट्रान्सपोर्ट कार्यालय येथे जमलेल्या मालवाहतूक ट्रकचालक आणि त्यांच्या मदतनीसांना कोरोना संसर्ग बचावासाठी आवश्यक असलेल्या मास्क आणि सॅनिटायझरचे निःशुल्क वाटप करण्यात आले.
लातूरच्या औसा रोड मुख्य रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचे तळ आहे. याठिकाणी असलेल्या ट्रकचालक आणि त्यांचे सहायक यांना कोरोना संसर्ग बचावासाठी जनजागृती करून त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्व गरजूंना मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण महामार्ग पोलिसांच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी महामार्ग पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.एम. गायकवाड, पोलीस नाईक राजेंद्र वाघमारे, सिद्राम धोपटे, शेखर पांचाळ, निखिल चव्हाण, इत्यादी कर्मचारी हजर होते. मालवाहतूक ट्रान्सपोर्ट संघटनेचे दिलीप खामकर, अजय पाटील, महादेव कोरले यांच्यासह अनेक ट्रकचालक आणि त्यांचे सहायक उपस्थित होते.