Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

विजापुर नाका पोलिसांची दमदार कामगिरी!बलात्कारातील फरार आरोपीस बिहार येथुन केली अटक

विजापुर नाका पोलिसांची दमदार कामगिरी!बलात्कारातील फरार आरोपीस बिहार येथुन केली अटक


सोलापुर प्रतिनिधी/ ईमाम जमादार 


आरोपी



सोलापुरः विजापूर नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 930/ 2020 भा.द.वी.  354 अ.ड.पोस्को कलम 7,8, 11(4) व 12  प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपीस कौशल्याने अटक केले. 
मा. पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे सो.सोलापूर यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीतील होणाऱ्या गैरकृत्य वर तात्काळ कार्यवाही करण्यावर आदेशित केले आहे त्यात विशेषतः महिला व  बालकांच्या विरुद्ध घडलेल्या गुन्ह्यामध्ये ते अधिक संवेदनशील राहून सदर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले.
 विजापूर नाका पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 
 930 /2020 भा.द.वि .354 कलम 7,8, 11, (4)12 प्रमाणे दिनांक 
20 /9/ 2020 रोजी दाखल गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. गुन्ह्यातील पीडित यांनी कोणतीही उपयुक्त माहिती दिली नव्हती तपासादरम्यान आरोपी हा त्याच्या मूळ गावी बिहार राज्यात असल्याची माहिती फार मोठ्या शिताफीने मिळवुन विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.शितलकुमार  कोल्हाळ, पोलीस कर्मचारी अय्यज बागलकोटे ( बक्कल नंबर 1267 ), 
शिवानंद भिमदे ( बक्कल नंबर 1419 ), 
राहुल वाघमारे ( बक्कल नंबर 1378),
अनिल गावसाने ( बक्कल नंबर 1303)यांची विषेश टीम तयार करून तांत्रिक तपासाच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे सदर गुन्ह्याबाबत कौशल्याने तपास करून आरोपीची माहिती काढून आरोपी नामे प्रदीप रामनारायण प्रसाद सध्या राहणार लक्ष्मी नगर हत्तुरे वस्ती,होटगी रोड तो गुन्हा घडल्यापासून तो आपल्या मुळगावी सेमरा जिल्हा बिहार येथे असल्याचे माहीती काढुन त्यास सोलापूर येथे येण्यास भाग पाडले आणि त्याला अटक केली सदरचे कामगिरी मा. पोलिस आयुक्त श्री अंकुश शिंदे  सो. पोलीस उपायुक्त परिमंडळ  श्रीमती वैशाली कडूकर सो.यांच्या..
 मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अायुक्त डाॅ.प्रीती टिपरे विभाग 2 ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.शितलकुमार कोल्हाळ यांनी कामगिरी केली .


Previous Post Next Post