अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची*
*मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून पाहणी शेतकऱ्यांना दिलासा
औसा प्रतिनिधि/ईश्वर बिराजदार
लातूर-गेल्या आठवड्यात परतीचा पाऊस जोरदार होऊन झालेल्या अतिवृष्टीने नुकसानीत आलेल्या शेतीची भाजपाचे नेते विधानसभेतील विरोधी पक्षनेते *मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब* यांनी दि. 20 ऑक्टोबर 2020 मंगळवार रोजी औसा तालुक्यातील आशिव, बोरफळ आणि बुधोडा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या थेट बांधावर जाऊन पहाणी केली,शेतकऱ्यांशी संवाद साधला. सातत्याने विविध संकटात सापडणाऱ्या शेतकऱ्याला शासनाने तात्काळ मदत दिली पाहिजे अशी मागणी करून यावेळी देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी न्याय मागण्यासाठी सोबत असल्याचे सांगून दिलासा दिला.
या दौऱ्यात भाजपाचे नेते माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्यू पवार, प्रदेश भाजपाचे गणेशदादा हाके, नागनाथअण्णा निडवदे, गोविंदआण्णा केंद्रे, माजी आमदार पाशा पटेल, शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्षा भारतबाई साळुंके, लातूर शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.