Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जावेद पटेल यांच्या प्रयत्नाला यश

वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जावेद पटेल यांच्या प्रयत्नाला यश


प्रतिनिधी/ईमाम जमादार



सोलापुर- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जावेद पटेल यांच्या प्रयत्नाला यश आले असून दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मी शिंदे यांची भेट घेऊन परिस्थिती पाहता सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरीकर यांना जावेद पटेल यांनी दूरध्वनी वरून हकीकत सहकार्य करण्याची विनंती केली असता लागलीच तत्परता दाखवत मा जिल्हाधिकारी यांनी लक्ष्मी शिंदे यांना कार्यालयात भेटायला बोलावून सर्व विचारपूस करून काय मदत करू असे आवाहन केले,
असे म्हणतात लक्ष्मी शिंदे यांनी मला स्वावलंबी जीवन जगायचे असून मला माझ्या शिक्षणा सोबतच माझ्या आई वडिलांचं आधार व्हायचे असून मला सद्यस्थितीत नोकरी मिळाली तर मी नोकरी करता करता अभ्यास करून मोठी अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण होईल शिवाय भाड्याने रिक्षा चालउन उदरनिर्वाह करणाऱ्या माझ्या आईवडील यांना हातभार लावता येईल,
हे ऐकताच सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबानी उप जिल्हाधिकारी देशमुख यांना बोलावून चर्चा केली लागलीच सद्यस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात नोकरी देण्यासाठी सूचना केल्या याला अनुसरून उपजिल्हाधिकारी देशमुख साहेबानी संभदित अधिकाऱ्यांना फोन  सर्व हकीकत सांगून तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी मिळवून दिली,
याबाबद्दल लक्ष्मी शिंदे व जावेद पटेल यांनी जिल्हाधिकारी यांचे आभार मानले,
यावेळी कय्युम जमादार,रऊफ जमादार,वंदना बुरुडे,प्रमोद केंद्रे सह लक्ष्मी शिंदे यांचे आई वडील उपस्तीत होते


Previous Post Next Post