पोदार इंटरनॕशल स्कुलच्या मनमानी शैक्षणिक फि विरोधात पालक आक्रमक भुमिकेत
प्रतिनिधी/महादेव पोलदासे
लातूर:(प्रतिनिधी) आज दि. १३/१०/२०२० वार - मंगळवार रोजी पोदार इंटरनॕशनल स्कुल लातूरच्या शैक्षणिक फि भरण्यास विरोध दर्शविण्यासाठी पालक आक्रमक होऊन लातूर जि.प.चे शिक्षणाधिकारी { प्राथ.} , शिक्षणाधिकारी { माध्य.},शिक्षण उपसंचालक ,लातूर, जिल्हाधिकारी साहेब,लातूर तसेच जिल्हाचे पालकमंत्री तथा वैदयकीय शिक्षण मंत्री अमित भैय्या देशमुख साहेब यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. प्रशासनाने विद्यार्थ्यांना पालकांनी शालेय व्यवस्थापणा बाबत खालील तक्रारी संबधीताकडे केल्या.
१} शालेय प्रशासन फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून किंवा ऑनलाइन क्लास पासून वंचीत ठेवत आहे. RTE अॕक्ट प्रमाणे कुठल्याही विद्यार्थ्यांना परीक्षा किंवा online class .पासून वंचीत ठेवता येत नाही.
२ } शालेय प्रशासन पालकांना अरेरावीची वागणूक देत आहे.
३ } शैक्षणीक वर्षात कोरोना - १९ मुळे पालक अर्थीक अडचणीत असल्यामुळे फक्त ५० ℅ ट्युशन फी टप्पा टप्प्याने घेण्यात यावी ईतर कुठलेही शुल्क आकारण्यात येऊ नये.
वरील सह.अनेक विषयी प्रशासन व पालक यांच्यात चर्चा होऊन वरिष्ठांनी कुठल्याही शैक्षणीक संस्थाची मनमानी व पालका सोबतची अरेरावी चालणार नसुन संबधीतावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. पालकांनी ही प्रशासनाने त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही नाही केल्यास लोकशाही पध्दतीने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. या शिष्टमंडळात विद्यार्थी पालक मंचचे मुख्य समन्वयक अॕड.उदय गवारे,संयोजक अॕड. प्रदीपसिंह गंगणे,केशव भैय्या गंभीरे,अच्चुत डूरे - पाटील,श्रीहरी जाधव,संजय बिरादार,अप्पासाहेब देशमुख यांच्यासह असंख्य माता - पालक उपस्थित होते.