Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

50 प्रशंसापत्र आणि 400 पुरस्कार मिळवणारा अधिकारी....! लातूर स्थानिक गुन्हेशाखेचे राष्ट्रपती पुरस्कार सम्मानित पोलिस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे

50 प्रशंसापत्र आणि 400 पुरस्कार मिळवणारा अधिकारी....!

लातूर स्थानिक गुन्हेशाखेचे

राष्ट्रपती पुरस्कार सम्मानित पोलिस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे

50 प्रशंसापत्र आणि 400 पुरस्कार मिळवणारा अधिकारी....


लातूर  –पाेलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांनी पाेलीस दलात  28 वर्षे दक्षपणे आपले कर्तव्य बजावून 50 प्रशंसापत्र आणि 400 पुरस्कार मिळवले आहे.1993 मध्ये ते पाेलीस उपनिरीक्षक म्हणून पाेलीस सेवेत दाखल झाले होते . यापूर्वी विदर्भातील भंडारा, गाेदिया जिल्ह्यांत काम केले आहे, तर मराठवाड्यातील नांदेड, बीड, परभणी आणि बाभळगाव येथील पाेलीस प्रशिक्षण केंद्रातही सेवा बजावली आहे. त्यासोबत नुकताच राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे जिल्ह्यातील ते एकमेव अधिकारी  आहेत. त्यांना साहित्य वाचमानाची आवड आहे. त्यांची पाेलीस दलात 28 वर्षे सेवा झाली आहे. त्यांना आजपर्यंतच्या सेवेबद्दल अंतरिक सुरक्षापदक, विशेष सेवापदक , पाेलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पुरस्कार मिळाले आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील 51 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे,त्यापैकी एक असलेले लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचा वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करून पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे अभिनंदन केले आहे.त्यामुळे लातूर जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रातून त्यांचे कौतूक होत आहे.





Previous Post Next Post