गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
"नाय वरण-भात लोंन्चा कोन नाय कोंन्चा".
या चित्रपटाच्या ट्रेलर प्रसंगी पोक्सो कोर्टा मध्ये १५६(३) अंतर्गत पॉक्सो कलम ,भारतीय दंड संहिता कलम व महिलांचे विभत्स प्रदर्शन कलम अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत तक्रार दाखल
सेंन्सार बोर्डानेही पाठवली नोटिस..!
मुंबई: माहिम पोलिस स्टेशन मध्ये लेखी तक्रार दाखल केली होती परंतू तक्रारीची दखल न घेतल्यामूळे तक्रारदाराने विशेष पोक्सो कोर्टात धाव घेतली. दिग्दर्शक , निर्माते , सह निर्माता, प्रोडक्शन , व नाय वरण-भात लोंन्चा कोन नाय कोंन्चा च्या अन्य संबंधित व्यक्ती यांच्यावर पॉक्सो कलम ......, भारतीय दंड संहिता कलम ..... व महिलांचे विभत्स प्रदर्शन कायदा कलम .....भारतीय स्त्री शक्ती संघटने तर्फे भारतीय दंड विधान १५६(३) अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत तक्रार करण्यात आली असुन त्या फिल्म ला सेंन्सार बोर्डाची नोटिस ही देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.आता या तक्रारीवर सोमवार दि.३१जानेवारी रोजी सुनावनी होणार आहे.
युट्युब वर एन एच मराठी या यूट्यूब चैनल वर तीन दिवसांपूर्वी अपलोड केलेला "नाय वरण-भात लोंन्चा कोन नाय कोंन्चा" या चित्रपटाचा ट्रेलर दिसला सदर ट्रेलर चे पोस्टर पाहिल्यावर काही कलाकार त्यामध्ये दिसत आहेत तसेच सर्वात पुढे दोन बाल कलाकार हे असून त्यांच्या कपड्यांना रक्त लागलेले आहे. त्यामुळे सदर व्हिडिओ तक्रारदाराने पाहिला असता व्हिडिओ बघून जोरदार धक्का बसला असल्याचे म्हटले आहे
सदर विडिओ हा १४ जानेवारी २०२२ रोजी येण्याऱ्या चित्रपटाचा ट्रेलर असल्याचे म्हटले आहे. सदर चित्रपट हा पैसे कमविण्याच्या उद्देशाने बनविलेला असून या 2 मिनिटे व 24 सेकंद च्या व्हिडिओ मध्ये दोन अल्पवयीन बालकांना लैंगिक कृतीमध्ये, विभत्स पणे दाखवले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेण या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच दोन लहान मुले ज्यांचे वय अंदाजे 13 ते 15 असेल ते अगदी शांतपणे रक्ताचे हात धुताना दाखवले आहेत. व त्याठिकाणी तीन जणांची मृतदेह पडलेले आहेत. तेच दोन मुले दुसऱ्या दृश्यात दिसत असून त्यामधील एक कुणी मारले असे विचारताना दिसत आहे. या वरून लहान मुलांना खुनी असल्याचे सादर विडिओ मध्ये दाखविले आहे व खून करून सुद्धा कोणताही पश्चातप त्यांना झालेला दिसत नाही.
२)या मध्ये, लहान मुलांच्या तोंडी घाण घाण शिव्या दाखविल्या आहेत.
३)सदर व्हिडिओ मध्ये लहान मुलांनी अनेकांना मारहाण केल्याचे तसेच अमानुषपणे चाकू भोसकल्याचे दाखवलेले आहे.
४) या व्हिडिओ मध्ये लहान मुलांसोबत अश्लील चित्रण केलेले असून अर्धनग्न स्त्रियांना त्यांच्यासोबत दाखवलेले आहेत. तसेच स्वतःच्या काकू बद्दल चुकीचे विचार करण्या बद्दलचे संवाद या व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहेत.
५) दोन निरागस मुलांच्या तोंडी नको नको ते संवाद दिलेले आहेत.
६) एका ठिकाणी असा संवाद दोन्ही अल्पवयीन मुलांमध्ये दाखवला आहे की एका मुलाचे वडील हे ‘भाई’ म्हणजे गुंड प्रवृत्तीचे असतात व मोठा झाल्यावर तो सुद्धा गुंड बनणार असे म्हणतो. त्यावेळी दुसरा लहान मुलगा त्याला म्हणतो की मी सुद्धा तुझा उजवा हात म्हणून तुझ्यासोबत काम करेल.
७) या ट्रेलर मधील काकू ही स्वतःच्या पुतण्यास नको त्या गोष्टीस उत्तेजित करीत असल्याचे दाखवले आहे. एका दृश्यात मध्ये अल्पवयीन मुलास एका अर्धनग्न महिलेसोबत अंघोळ करतानाचे बाथरूम मधील दृष्य दाखवले आहे.
८) एक महिला तिच्या बाळास दूध पाजत असताना तिच्याकडे तो अल्पवयीन मुलगा वासनांध नजरेने बघत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखवले आहे.
९) या व्हिडिओच्या शेवटच्या दृश्यांमध्ये या दोन अल्पवयीन मुलांनी एका जोडप्यास बंदिस्त करून ठेवलेले आहे
सध्या लॉकडाऊन मुळे ऑनलाइन शाळा होत असल्यामुळे जवळपास सगळ्याच लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन आलेले असून ऑनलाईन शाळेसाठी इंटरनेट गरजेचे असल्यामुळे प्रत्येकाकडे इंटरनेट सुद्धा आहे अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांचा सहभाग असलेला या प्रकारचा अश्लील ट्रेलर युट्युब या माध्यमावर टाकलेला असून त्यामुळे अनेक लहान मुलांच्या बाल मनावर परिणाम होण्याची शक्यता असून या दृश्यामुळे लहान मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यास मदत होईल.
जरी हा चित्रपट अठरा वर्षाच्या पुढील लोकांसाठी असला तरी यामध्ये ज्या प्रकारे बालकांचा वापर केलेला आहे तो लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण २०१२ (POCSO) या कायद्याअंतर्गत गुन्हा असून अशाप्रकारे ट्रेलर व चित्रपट बनवून बालकांचा चुकीचा वापर करून आरोपी त्याद्वारे अर्थार्जन करीत आहात. तरी प्रोडक्शन , दिग्दर्शक , निर्माते ,सह निर्माता व नाय वरण-भात लोंन्चा कोन नाय कोंन्चा च्या अन्य संबंधित व्यक्ती वर लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण २०१२ (POCSO) कलम ......, भारतीय दंड संहिता कलम ..... व महिलांचे विभत्स प्रदर्शन कायदा कलम .....या कायद्याअंतर्गत व अन्य संबंधित कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा अशी तक्रार पोलिस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली असुन ,या बाबत गुन्हा दाखल झाला तर तर चित्रपट निर्मात्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
"समाजातील अल्पवयीन मुलांवर अशा प्रकारच्या चित्रपटामुळे मनावर परिणाम होवून ते वाईट मार्गाला जाण्याची भीती निर्माण होते,आणि तसे झाल्यास,खुन, बलात्कार करण्याच्या घटना वाढतात नुकताच लातूर मध्ये विशाल नगर परिसरात झालेल्या एका काॅलेज तरुणाच्या खुना मध्ये अल्पवयीन मुलाचा समावेश अढळल्याची ताजी घटना आहे.त्यामुळे अशा चित्रपटावर कायमची बंदी घालण्यात यावी व संबंधीतावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा."
-ॳॅड.प्रकाश साळसिंगेकर
क्रिमिनल प्रॅक्टीशनर, मुंबई