Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

गुन्हेगारीचा पर्दाफाश….! लातूर जिल्हा परिषद चे समाज कल्याण अधिकारी यांना वाशिम कोर्टात न चुकता हजर राहण्याचे आदेश

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर जिल्हा परिषद चे समाज कल्याण अधिकारी यांना वाशिम कोर्टात न चुकता हजर राहण्याचे आदेश 

आर्थिक लाच मागितल्या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार कलम ७, १३ (१) व १३ (२) नुसार नोटीस



लातूर प्रतिनिधी:- : मंगरूळपीर जवळच्या तुळजापूर येथील मूकबधिर व दिव्यांग निवासी विद्यालय या शाळेचे अनुदान काढण्यासाठी व सौ. फुकटे या शिक्षिकेचे देय नसलेले थकित वेतन काढण्यासाठी संस्थेकडे आर्थिक लाचेची मागणी केली होती.

तत्कालीन समाज कल्याण अधिकारी श्री सुनील खमितकर व लेखा अधिकारी श्री प्रकाश टीके यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून संस्थेवर खोटेनाटे आरोप करून शाळेची मान्यता काढणे, प्रशासक नियुक्त करणे व विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे अनधिकृत रित्या मान्यता रद्द करणे व संस्थेवर खोटा गुन्हा नोंदवून शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे अनधिकृत रित्या वेतन थांबविणे ई आपल्या पदाचा दुरुपयोग करीत संस्थेवर दबावतंत्राचा वापर करीत होते .
म्हणून संस्था अध्यक्ष श्री भिमराव राठोड यांनी लाचलुचपत प्रतिबंधक अधीक्षक वाशिम यांच्याकडे दि २५-०५-२०१९ तक्रार दाखल केली होती परंतु लाचलुचपत विभागाने वरील गैरअर्जदार वर गुन्हा नोंदविण्यास असमर्थता दर्शविली होती त्यामुळे फिर्यादी श्री राठोड यांनी दि ०७-१०-२०१९ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश वाशिम यांच्याकडे फिर्याद क्रमांक ४०/२०१९ दाखल केली होती यामध्ये माननीय न्यायालयाने दिनांक ०४-१२-२०२१ रोजी आदेश पारित करून तत्कालीन जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री सुनील खमितकर व तत्कालीन लेखाधिकारी श्री प्रकाश टीके यांच्यावर लाच मागितल्या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार कलम ७, १३ (१) व १३ (२) नुसार नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

सामाजिक न्याय अंतर्गत जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असतो त्यामध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी चा हे एक पद असून त्यांना देखरेखीसाठी त्यांच्या अंतर्गत येत असलेले दिव्यांग शाळा वस्तीगृह इत्यादी बाबी तपासून शासनाला अहवाल पाठविण्याचे काम या समाज कल्याण अधिकारी यांचे मार्फत होत असते  पण श्री खमितकर या गोष्टीचा अपवाद म्हणून ठरतात मुळात समाजाचा कल्याण करण्यासाठी या अधिकाऱ्याची नियुक्ती असते पण लातूर चा समाज कल्याण अधिकारी हा एक वेगळेच उदाहरण म्हणून पुढे आले नाही गत चार वेळेस निलंबित होऊन पाचव्यांदा तो जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून जिल्हा समाज कल्याण विभागजिल्हा परिषद लातूर येथे कार्यरत आहे श्री खमितकर यांनी कोणतेही कारण नसताना  संस्थाचालक, कर्मचारी  वेठीस धरून आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कर्मचा, संस्था चालकांना त्रास द्यायचे असे याची थोडक्यात माहिती श्री खमितकर हे या अगोदर देखील सोलापूर मध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत असताना अँटी करप्शन ब्युरो च्या अंतर्गत पकडले गेले होते . त्यानंतर 2019 मध्ये वाशीम येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकतर्फीकार्यमुक्त करून त्यांना तेथून हकालपट्टी करण्यात येऊन शासनाकडे जमा करण्यात आलेले श्री खमितकर हे एवढ्यावरच न थांबता त्यांच्या कडील जिल्हा समाज कल्याण अधिकारी यवतमाळ हा पदभार असताना त्यांनी पैशाची अफरातफरी करून जिल्हा परिषद अध्यक्ष यवतमाळ यांनी त्यांची हकालपट्टी करण्यात आली भ्रष्टांचाराची परीकास्ट गाठलेला हा समाज कल्याण अधिकारी सुद्धा  शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून हा अधिकारी वारंवार उच्च पदावर बसून पदोन्नती घेऊन या विभागात पैसे खाऊन काम करीत आहे.
 लातूर येथील एका महिलेवरअत्याचार करून शारीरिक सुखाची मागणी करणारा हा अधिकारी आजपर्यंत बड्याखुषाली ने जिल्हा समाज कल्याण अधिकारी लातूर येथे कार्यरत आहे नुकताच मिळालेल्या माहिती नुसार वाशिम येथे कार्यरत असताना तेथील एका संस्थाचालक व काही कर्मचार्‍यांना वेठीस धरून त्यांना विनाकारण त्यांचे वेतन थांबवुन नियमबाह्य पद्धतीने एका शिक्षिकेचे वेतन काढण्यासाठी दबावतंत्राचा वापर करून श्री खमितकर यांनी लाचेची मागणी केली होती  मिळालेल्या माहितीनुसार वाशीम येथील  जिल्हा सत्र न्यायालय यांनी त्यांच्या नावे  अँटी करप्शन च्या अंतर्गत येत असलेल्या काही कलमांतर्गत त्यांना ही नोटीस बजावण्यात आलेले आहे 28 जानेवारी २०२२ रोजी जिल्हा सत्र न्यायालयात  त्यांच्यावर सुनावणी होणार आहेत.


"फेक मॅटर आहे त्याच्या दोन्ही शाळा बंद केल्या होत्या १६ वर्षाच्या मुलाला मुख्याध्यापक करून ३० लाख उचलले होते असं कोर्टाला विचारता येत नाही आम्ही उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत -"
-जिल्हा समाज कल्याण अधिकारी
सुनील खमितकर


Previous Post Next Post