Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

गुन्हेगारीचा पर्दाफाश….! मांडूळ सापाची तस्करी करणारी आंतरराज्य सहा आरोपी ची टोळी पोलिसांनी केली जेरबंद

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

मांडूळ सापाची तस्करी करणारी आंतरराज्य सहा आरोपी ची टोळी  पोलिसांनी केली जेरबंद


         या बाबत थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 24/01/2022 रोजी पोलीस स्टेशन अंतर्गत बेलकुंड परिसरात पेट्रोलिंग करीत असताना भादा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवले यांना  बातमीदार कडून माहिती मिळाली की, एक कर्नाटक पासिंग असलेली ईनोवा कार शिंदाळापाटी येथून चिंचोली पाटीकडे जाणार आहे. सदरच्या कारमधील लोकांच्या हालचाली संशयास्पद आहेत.अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमीची खात्री करून ती माहिती माहिती वरिष्ठांना देऊन लागलीच पंचांना व पेट्रोलिंग वरील पोलीस अंमलदारांना सोबत घेऊन चिंचोली पाटि येथे सापळा लावला.
          थोड्याच वेळात बातमी प्रमाणे वर्णन असलेली एक गजगा  रंगाची ईनोवा गाडी क्रमांक के.ए. 32 एन 2824 येताना दिसली. त्या गाडीला हात करून थांबवले असता त्या गाडीमध्ये 06 लोक बसलेले दिसले. त्या सर्वांच्या हालचाली संशयास्पद व घाबरल्यासारखे हावभाव करीत असल्याने त्यांना गाडीच्या खाली उतरून  झडती घेतली असता त्याच्या कारच्या पाठीमागे एका बॅगमध्ये एक  मांडूळ जातीचा दुर्मिळ साप आढळून आला. सदरच्या मांडूळ सापाबद्दल नमूद इसमाकडे विचारपूस केली असता त्यांनी काही एक समाधानकारक उत्तर दिले नाही. नमूद इसमांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव
1) माणिक शंकर तळकेरी, वय 42 वर्ष, राहणार जगतएरिया जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक
 2) शोएब एतेशाम खान, वय 33 वर्ष, राहणार इस्लामाबाद कॉलनी गुलबर्गा
 3) बाबू मेहबूबसाब जमादार ,वय 50 वर्ष, राहणार नया मोहल्ला गुलबर्गा 
4)समीर मोहम्मद सद्दाम नदाफ, 30 वर्ष राहणार डबराबाद, गुलबर्गा
 5) दयानंद बालवीर सरतापे , वय 32 वर्षे राहणार शिंदाळवाडी तालुका औसा
 6) सिराज अहमद इरफान हसन, वय 26 वर्ष राहणार चुनाभट्टी रिंग रोड गुलबर्गा राज्य कर्नाटक असल्याचे सांगितले.
वर नमूद इसमा विरोधात पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 15/3022 कलम 9,39,51 वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला. असून सदर गुन्ह्यात दुर्मिळ मांडूळ जातीचा साप तसेच गुन्ह्यात वापरलेली ईनोवा गाडी असा एकूण इतक्या रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदरचे आरोपी हे मांडूळ जातीचा साप कर्नाटक येथून आणला असून तो आरोपी नामे दयानंद सरतापे यास विक्री करणार होते. अशी प्राथमिक माहिती मिळाली असून गुन्ह्याचा अधिक तपास  पोलीस करीत आहेत. 
      सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन विभागीय पोलीस अधिकारी औसा श्री. मधुकर पवार यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन भादा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले, पोलीस अमलदार बंडू डोलारे, सतीश सारोळे,चंदू कलमे, शिवरुद्र वाडकर, फिरोज शेख, विठ्ठल दिंडे यांनी बजावली.


Previous Post Next Post