गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
महानगरपालिके मध्ये कचरा ठेका प्रकरणात
४कोटी रुपयाच्या भ्रष्टाचार प्रकरणी छत्रपती चौकातील पोलिस स्टेशन मध्ये नगरसेवक प्रकाश पाठक यांना धक्काबुक्की..!
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, प्रधान सचिव नगर विकास विभाग, युडी-2, महाराष्ट्र शासन, महेश पाठक (एम. डी. पाठक), नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी श्री अजित पालवे व लातूर शहर महानगरपालिकेचे चीफ अकाऊंटस् ऑफ समद एच. शेख व वसुंधरा पर्यावरणवादी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मन्मथ शंकरराव कोरे यांनी कटकारस्थान करुन बेकायदेशीर व महानगरपालिकेची फसवणुक करुन रु. 4.00 कोटी (रुपये चार कोटी) चा सार्वजनिक निधीत अपहार करुन भ्रष्टाचार व महानगरपालिकेचा विश्वासघात केला आहे. त्याबाबत त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 120 ए, 166, 420, 403, 409 अन्वये गुन्हा दाखल करुन चौकशी करणेबाबत नगर सेवक प्रकाश पाठक हे सोमवार दि३१जानेवारी रोजी पोलिस स्टेशन मध्ये गेले असता त्यांना तेथील काहि कर्मचार्यांनी अर्वाच्य भाषेत शिविगाळ करुन धक्का-मुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.प्रकाश पाठक यांचे वय पाहता त्यांचे जे काही म्हणणे आहे ते रितसर घेवून कायदेशीर कार्यवाही अपेक्षीत असताना असा हाप्रकार होने म्हणजे लातूरकरांच्या दृष्टीने योग्य नसल्याचे बोलले जात आहे.
नगरसेवक प्रकाश पाठक यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयात रितसर तक्रार दिली असुन त्या तक्रारी मध्ये पोलिस स्टेशन मधील त्या कर्मचार्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे तसेच तत्कालीन लातूर नगर परिषद असताना वसुंधरा पर्यावरणवादी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेस शहरातील कचरा ठेका पध्दतीने स्वतःच्या वाहनाने उचलून डंपोग साईटवर नेवून टाकणे, या कामाचे कार्यादेश दि. 14.10.2005 रोजी देण्यात आले होते.
लेखापरिक्षक, नगर परिषद लातूर यांनी त्यांच्या 2005-2006 ते 2007 2008 च्या लेखापरिक्षणातील वसुंधरा पर्यावरणवादी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेस दिनांक 14.10.2005कायदेशान्वये दिलेल्या देयकाबाबत आक्षेप क्र. 21 खाली आक्षेप आहे.
वसुंधरा पर्यावरणवादी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर ये अध्यक्ष मन्मथ शंकरराव कोरे यांनी तत्कालीन आयुक्त श्री देविदास टेकाळे. लातूर शहर महानगरपालिका लातूर सध्याचे आयुक्त अमन मित्तल, प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, यूडी-2 चे श्री महेश पाठक (एम. डी. पाठक) कक्ष अधिकारी श्री अजित पालवे व चिफ अकाऊंटस् ऑफिसर, लातूर शहर महानगरपालिका, समद एच. शेख यांनी यांच्याबरोबर सार्वजनिक निधीत अपहार करण्यासाठी कटकारस्थान रचण्यात आले. करारनाम्यामध्ये परिच्छेद 4.1 प्रमाणे प्रति वर्षी 10 टक्के वाढ या सबबीखाली 7.48 कोटीचे देयके बनवण्यात आली व तब्बल 8 वर्षांनी सन 2020 मध्ये सदरील देयके वसुंधरा पर्यावरणवादी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेस अदा करण्यासाठी सार्वजनिक निधीत अपहार असल्याबद्दल यांच्या विरुध्द भारतीय दंड संहितामधील कलम 120 अ. 166, 420, 403, 409 अन्वये गुन्हा नोंद करुन चौकशी करावी व ठेकेदाराला बेकायदेशीर पणे देण्यात आलेले करोड़ रुपये वसुली करावी अशी मागणी केली आहे. असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.आता यावर पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे साहेब काय कार्यवाही करणार याकडे सर्व लातूरच्या जनतेचे लक्ष लागले आहे.
"मी पोलीस स्टेशन येथे अमन मित्तल मनपा आयुक्त यांच्या विरूध्द तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता मला तेथील पोलीसांनी धक्का बुक्की करून आर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्या कर्मचार्यांवर तात्काळ कार्यवाही नाही झाली तर मी पोलिस अधिक्षक कार्यालया बाहेर उपोषणास बसणार ".
-नगरसेवक प्रकाश पाठक