गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
बनावट आदेश तयार करून दस्तांची नोंदणी प्रकरण..!
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर स्वतंत्र तीन गुन्हे दाखल
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे बनावट अकृषी आणि गुंठेवारीचे आदेश तयार करून त्याच्या आधारे येथील साहायक दुय्यम निबंधक कार्यालयात दस्ताची नोंदणी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर लातुरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकाराने लातुरात
पोलिसांनी सांगितले, लातुरातील सह दुय्यम निबंधक सतीश बनसोडे यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. सह दुय्यम निबंधक वर्ग २ लातूर क्रमांक १ यांच्या कार्यालयात दस्तांची नोंदणी झाली एकच खळबळ उडाली आहे. आहे.
● श्रीकांत चंद्रशेख हिरेमठ यांनी दस्त नोंदणी करुन दस्तास बनावट • अकृषी आदेश तयार करुन तो खरा आहे म्हणून दस्ताची नोंदणी करुन शासनाची फसवणूक केली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दस्तासोबत जोडलेला अकृषी आदेश हा जिल्हाधिकारी लातूर यांच्या कार्यालयाकडून निर्गमित झालेला नाही, असे आदेशात स्पष्ट म्हटले आहे. त्यानुसार सह दुय्यम निबंध कार्यालयाने दस्ताची छाननी केली यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हे आदेश नसल्याचे दिसून आले. यामध्ये बनावट अकृषी आदेश तयार करून शासनाची फसवणू केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये बालाजी नागनाथ चिकटे (रा. हरंगूळ), शिवदास रावसाहेब बिडवे (रा. हरगूळ) यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारीयांच्या आदेशानंतर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सूर्यकांत
महादेव खोबरे (रा. हरंगूळ) यानेही असाच प्रकार केल्याचे समोर आले आहे. त्याने दस्त क्रमांक २७३४ / २०२१ या दस्ताची नोंदणी केली होती. यात दस्तास त्याने जिल्हाधिकारी कार्यालयाचा बनावट गुंठेवारी नियमाधीन आदेश तयार करून तो खरा आहे म्हणून दस्ताची नोंदणीसाठी वापरुन जिल्हाधिकारी, सह दुय्यम निबंधक वर्ग २ कार्यालयाची अर्थात शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी प्रभारी सहा दुय्यम निबंधक वर्ग २ श्रीनिवास जगदाळे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनग
र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.