स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक माननीय गजानन भातलवंडे यांना राष्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल ब्राम्हण समाजाच्या वतीने सत्कार
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक माननीय गजानन भातलवंडे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यानिमित्ताने सकल ब्राम्हण समाज बांधवांच्या वतीने व मान्यवरांच्या उपस्थित त्यांचा सत्कार समारंभ जोशी क्लासेसच्या सभागृहांमध्ये शनिवार दि.१९फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी लातुरातील प्रसिद्ध डॉक्टर विश्वास कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून माजी स्थायी समिती सभापती अशोकराव गोविंदपूरकर तात्या, दिवाकर राव कुलकर्णी आणि ज्येष्ठ विधिज्ञ कालिदास राव देशपांडे प्रमुख वक्ते म्हणून एडवोकेट श्रीराम देशपांडे उपस्थित होते याप्रसंगी जिल्हा सरकारी वकील एडवोकेट संतोष देशपांडे यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला तसेच बिजनेस डायरी चे प्रकाशन मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले उत्तरादी मठाचे रघूतांम आचार्य यांनी आशीर्वचन म्हटले या कार्यक्रमासाठी पापाशेठ ताथोडे ,एडवोकेट विठ्ठल देशपांडे एडवोकेट सुजित तावशीकर एडवोकेट देवानंद आराध्ये, जगदीश कुलकर्णी एडवोकेट गुरुराज संदिकर प्रदीप वेल्हाळ योगेश काळे ,डॉक्टर महेश उगाले ,बाळासाहेब देशपांडे, किशोर पानसे , एम आर कुलकर्णी गोपाळ जेवळीकर ,कमठनकर महाराज,प्रवीण देशपांडे धोंडदेव सर,बोरगावकर सर,आराध्ये सर,शिरीष पोफळे,राहुल मातोलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉक्टर रवीराज पोरे, सुधाकर जोशी एडवोकेट महेश खनगे ,लक्ष्मीकांत परांडेकर, नरेश कुलकर्णी ,ईश्वर कुलकर्णी ,किरण येळनूरकर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी जवळपास 100 समाज बांधव उपस्थित होते