सापडलेले सोन्याचे गंठण वापस करुन दाखवला
''त्या' कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणा
प्रमोद गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या राजूसिंग राजपूत या कामगाराने सापडलेले सोन्याचे गंठण शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी ठाण्यातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते..
लातूर : शहरातील प्रमोद गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या राजूसिंग हिरासिंग राजपूत या कर्मचाऱ्यास सावेवाडी येथे सोमवार, २१ फेब्रुवारी रोजी सोन्याचे गंठण सापडले. दरम्यान,कर्मचाऱ्याने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांना माहिती दिली आणि गंठण पोलिसांकडे सपुर्त केले. या प्रामाणिकपणाबद्दल शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दिलीप डोलारे, प्रमोद गॅस एजन्सीचे प्रमुख भूषण दाते. व्यवस्थापक किशोर जोशी यांनी राजूसिंग राजपूत यांचा सत्कार केला. यावेळी इतरांनी कौतुक केले.