प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे** *राज्य कोष्याध्यक्ष लक्ष्मण कांबळे याची धरतीपुत्र किसान ट्रस्टच्या च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड*
प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य कोष्याध्यक्ष लक्ष्मण कांबळे याची धरतीपुत्र किसान चे संस्थापक अध्यक्ष मा महेंद्रभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याच्या धरतीपुत्र किसान ट्रस्टच्या उपाध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र देण्यात आले आहे. धरतीपुत्र किसान ट्रस्ट हे संघटन सबंध देशांतील शेतकऱ्याच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र काम करत असून या ट्रस्टचे कार्यक्षेत्र भारतभर आहे .त्यात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य कोष्याध्यक्ष लक्ष्मण कांबळे हे समाजातील दुर्बल घटकातील सर्व सामान्यांना सामाजिक कार्याच्याच्या व पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देत असल्याची चर्चा धरतीपुत्र किसान चे संस्थापक यांना समजताच त्यांनी लक्ष्मण कांबळे यांच्या समाज कार्याची व निर्भीड पत्रकारीतेची दखल घेत धरतीपुत्र किसान ट्रस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करतील या उद्देशाने यांची निवड केल्याचे नियुक्ती पत्र लक्ष्मण कांबळे यांना देण्यात आले आहे या निवडीबद्दल त्यांचे सामाजिक राजकिय क्षेत्रातून तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष डी टी आंबेगावे सह अनेक पत्रकारांनी अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या