पोलिस निरिक्षक सुधाकर बावकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन
माता रमाई आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्मा जयंतीनिमित्त मोफत सर्वरोगनिदान शिबीर संपन्न
दिनांक 13 /2/2022 रोजी माता रमाई आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्मा जयंतीनिमित्त , बहिष्कृत हितकारणी संघर्ष समिती व व्हिजन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोगनिदान शिबीर सम्राट चौक वडार भवन येथे आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवजी महाराज माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे पो.नी. मा. सुधाकरजी बावकर साहेब व डॉ विजय अजनिकर साहेब यांच्या हस्ते करून या कार्यक्रमाला सुरूवात झाली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लक्ष्मण शिंदे तर सदरील कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यात ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला ते आकाश हुलगुंडे, सूरज शिंदे, बालाजी हुलगुंडे, राजू हुलगुंडे,अर्जुन शिंदे,अमोल शिंदे,निलेश सिरसाट,निखील गायकवाड, भैया वाघमारे,निलेश कांबळे, अक्षय धावारे, बबलू गवळी,सतीश करंडे,बाबा ढगे, D उमाकांत, आकाश ढगे, महेश गुंड यांचे अभिनंदन, तसेच बहिष्कृत च्या सर्व टीम मार्फत व्हिजन हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ चे खूप खूप आभार